Goa Drugs Case: अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

Goa Drugs Case: न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली
Goa Drugs Case
Goa Drugs CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Drugs Case: गोव्यात वाढत्या अपघातांसोबतच अमली पदार्थांच्या विक्रीचे, हाताळणीचे प्रमाण वाढले असून पोलिसांच्या सतर्कपणामुळे अवैध घटना उघडकीस येत आहेत. नुकतीच उत्तर गोव्यातील मोरजी गावडेवाडा इथून एक अपडेट हाती येतेय.

गांजा बाळगल्या प्रकरणी आठ दिवसांपूर्वी अटक केलेल्या गोपी उर्फ गोपीनाथ गुणाजी हरमलकर व शुभम शर्मा यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अडीच किलो गांजा बाळगल्या प्रकरणी उत्तर गोवा पोलिसांनी त्यांना आठ दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते. त्यांच्या कंदील मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून त्यांना अटक केली होती.

दरम्यान आज मंगळवारी या दोघांना न्यायालयासमोर उभे केलं असता सुनावणीवेळी न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Goa Drugs Case
Goa Court : भाटी पंचायतीला बजावली न्‍यायालयाने अवमान नोटीस

काही दिवसांपूर्वी शिवोली येथे क्राईम ब्रांचने 1.5 ग्रॅम गांजा आणि कोकेन पकडले होते.

या प्रकरणात सहभागी असणाऱ्या प्रणय मोरे नामक मुंबई येथे राहणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले असून जप्त केलेल्या अमली पदार्थाची बाजार किंमत 3.5 लाख असल्याची माहितीही त्यावेळी समोर आली होती.

तसेच याच दरम्यान गिरी, म्हापसा येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकत 19 वर्षीय ओडिशाचा रहिवासी असलेल्या व्यक्तीला अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com