Goa Corona Update: देशातील कोरोना संसर्गाचा वेग मंदावला असून, विविध राज्य कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. गोव्यात केवळ हाताच्या बोटावर मोजण्याएवढे सक्रिय कोरोना रूग्ण असून, राज्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू आहे.
राज्यात आज चार दिवसानंतर केवळ एका नवीन कोरोनाबाधित रूग्णाची नोंद झाली आहे. तसेच, दिवसभरात एका कोरोनामुक्ताला डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात मागील मोठ्या कालावधीत कोरोनामुळे एकही रूग्ण दगावल्याची घटना नाही.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने सायंकाळी राज्यातील कोरोना आकडेवारीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार, राज्यात शनिवारी 384 नमुने तापासण्यात आले, त्यापैकी 01 सकारात्मक आला आहे. तर, दिवसभरात 01 कोरोनामुक्ताला डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज नव्याने कोणताही कोरोना रूग्ण दगावलेला नाही.
राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 98.47 टक्के एवढा आहे. सध्याच्या घडीला राज्यात केवळ 03 सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
गोव्यात आजवर 02 लाख 63 हजार 332 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यापैकी 02 लाख 59 हजार 315 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजवर 4 हजार 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान, राज्यात 28 ते 31 जुलै याकाळात एकही नव्या कोरोनाबाधित रूग्णाची नोंद झाली नाही. यापूर्वी 27 जुलै रोजी दोन नव्या रूग्णांची नोंद झाली होती. त्याच्या चार दिवसानंतर आज एक रूग्णांची नोंद झालीय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.