Goa Congress : नऊ तालुक्यांत टँकर माफियांचा सुळसुळाट; काँग्रेसचा हल्लाबोल

जलस्रोत खात्याचे अभियंता बदामी म्हणतात, खासगी टँकरमधील पाणी पिऊ नका!
Goa Congress submitted Memorandum to Chief Engineer, WRD Porvorim
Goa Congress submitted Memorandum to Chief Engineer, WRD Porvorim Dainik Gomantak
Published on
Updated on

राज्यातील पाणी प्रश्‍न सोडविण्यात भाजप सरकारला अपयश आले आहे. या टंचाईचा लाभ भाजपपुरस्कृत टँकर माफिया उठवत आहेत. राज्यातील नऊ तालुक्यांत टँकर माफियांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप करीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी याची सेवानिवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली.

यावर, खासगी टँकरमधील पाणी पिण्यासाठी वापरू नये, ‘साबांखा’च्या टँकरमधील पाणी पिण्यासाठी वापरावे, असे आवाहन जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी केले आहे. पाटकर यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी पर्वरी येथील जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांना घेराव घातला.

याप्रसंगी ॲड. श्रीनिवास खलप, कॅप्टन विरिएतो फर्नांडिस, महिला काँग्रेस अध्यक्षा बीना नाईक, वीरेंद्र शिरोडकर, सावियो डिसिल्वा, एव्हर्सन वालिस, मुक्तमाला शिरोडकर, विजय भिके, मोरेन रिबेलो, ॲड. जितेंद्र गावकर, सुदिन नाईक, राजेंद्र कोरगावकर, संजय बर्डे, दिव्या कुमार आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Goa Congress submitted Memorandum to Chief Engineer, WRD Porvorim
Verna News: सांकवाळ मधील 'त्या' घटनेसंबंधी चौघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

सांकवाळमध्ये टँकरमध्ये सांडपाणी भरल्याच्या घटनेनंतर काँग्रेसने विविध सरकारी खात्यांच्या प्रमुखांना घेराव घालून जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. याप्रसंगी त्यांनी अभियंता बदामी यांना निवेदन सादर केले.

यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्तीच केली. पाटकर यांनी पेडणे, बार्देश आणि तिसवाडी या तालुक्यांतील पाणी टँकरचालकांकडूनच शासनाला महसूल मिळतो, या दाव्याला पुष्टी देणारे कागदोपत्री पुरावे सादर केले.

पाणी टँकर चालवणाऱ्यांवर जलस्रोत विभागाचे अजिबात नियंत्रण नाही. नफा मिळविण्यासाठी टँकरचालकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. त्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचा आरोप पाटकर यांनी केला.

पाटकर म्हणाले की, सांकवाळ येथे सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाण्याच्या टँकरबाबत बदामी योग्य माहिती देऊ शकले नाहीत. शिवाय बदामी यांनी खात्याची चूक कबूल करून जनतेने खासगी टँकरचे पाणी पिण्यासाठी न वापरण्याचे आवाहन केले. बदामी यांनी असे आवाहन केल्याने हा प्रकार गंभीर असल्याचे स्पष्ट होते, असेही त्यांनी सांगितले.

Goa Congress submitted Memorandum to Chief Engineer, WRD Porvorim
Goa Cricket Association: किंग्स स्कूलच्या जेतेपदात लेगस्पिनर जय कांगुरीचा वाटा

सांकवाळ टँकरप्रकरणी सविस्तर अहवाल मागवला : प्रमोद बदामी

... अन् पोलिसही झाले निरुत्तर

कॉंग्रेसचे शिष्टमंडळ जलस्रोत खात्याच्या मुख्य अभियंत्यांना भेटण्यासाठी जाणार असल्याचे समजल्यानंतर त्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर पोलिस बंदोबस्त ठेवला होता. शिष्टमंडळाने इमारतीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांनी त्यांना अडविले. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांना उलट प्रश्‍न केले. काही वेळ रोखून धरल्यानंतर पोलिसांनी शिष्टमंडळास आत जाऊ दिले.

साबांखा टँकरला प्राधान्य द्या!

बदामी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, सांकवाळ येथील प्रकाराबाबत वृत्तपत्रांतील बातमीवर आम्ही विश्‍वास ठेवू शकणार नाही. याचा सविस्तर अहवाल मागविला आहे. त्यातून ते काय स्पष्ट होईल. खासगी टँकरमधील पाणी पिण्यासाठी वापरू नये. पिण्यासाठी साबांखाच्या टँकरचे पाणी वापरावे.

टँकरमध्ये सांडपाणी; चौघांवर गुन्हा दाखल

वास्को : पिण्याच्या पाण्याच्या टँकरमधून सांडपाणी वाहून नेल्याचे प्रकरण वादग्रस्त वळण घेत असतानाच याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी आज, शुक्रवारी चौघाजणांवर गुन्हा नोंदवला. मात्र, या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी टँकरमालक (क्र.जीए-०६- टी-४६८३) नजीर सय्यद, रा. झरीत, झुआरीनगर, हजरत पटेल बिरादार, बिर्ला, झुआरीनगर (क्र. जीए-०४- टी-०९६७) जबी उल्ला वार, रा. झुआरीनगर आणि श्री जयराम या चौघांवर गुन्हा नोंदवला आहे.

पाणी पुरवठ्यासंदर्भातील उच्च न्यायालयाचे निर्देश धाब्यावर

  1. राज्यातील टँकरवर कोणतेच नियंत्रण नव्हते. मोजके टँकर वगळता बहुतेक टँकरची नोंदही कोठे नव्हती. पाण्याची तपासणीही केली जात नव्हती. अशा या बेकायदा पाणी पुरवठ्याची उच्च न्यायालयाने दहा वर्षांपूर्वी दखल घेतली होती. उच्च न्यायालयाने टँकरसंदर्भात अनेक निर्देश दिले होते.

  2. टँकरची नोंद वाहतूक खात्याने करावी. तो नोंदणी क्रमांक टँकरवर असावा. त्या वाहनांची नोंदणी असलेला दस्तावेज खात्याने तयार ठेवावा. टँकरने पाणीपुरवठा केला जातो तो कोणत्या भागातून वा विहिरीतून पाणी खेचून केला जातो, याची माहिती देणे, तसेच पाण्याच्या तपासणीचे निर्देशही पाणीपुरवठा खात्याला दिले होते.

  3. ज्या ठिकाणी पाणीटंचाई आहे तेथील विहिरीतील पाणी टँकरने पुरवण्यास बंदी घातली होती. विहिरीची नोंद जलस्रोत खात्याकडे असणे सक्तीचे केले होते. या विहिरींवर मीटर बसवावेत. दिवसागणिक ठराविक प्रमाणातच पाणी टँकरमध्ये भरण्यास परवानगी आहे. मात्र, हे निर्देश धाब्यावर बसवून पाणीपुरवठा सुरू आहे.

टँकरधारकांसाठी अधिसूचना

मंगळवारी सर्व टँकरधारकांसाठी अधिसूचना काढली जाईल. त्यात हा स्टील टँकर असून, त्यातील पाणी पिण्यासाठी योग्य असल्याचे नमूद केलेले असेल. ज्या टँकरधारकांना पाणी पुरवठ्याचे परवाने दिलेले असतात, त्यांना या सर्व नियमांचे पालन करावे लागते.

काहीवेळा अतिघाईत टँकर मागविले जातात, तेव्हा ते टँकर स्टील बॉडीचे असतीलच, असे नाही. सांकवाळसारख्या घटना घडत असतील तर लोकांनी आमच्या नजरेस आणून द्याव्यात, असे आवाहन बदामी यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com