पणजी : प्रदेश काँग्रेसचे काही आमदार पक्षांतराच्या वाटेवर असल्याने आधीच धिंडवडे निघाले असताना आता पक्षाच्या तिजोरीत खडखडाट असल्याची जोरदार चर्चा सध्या राज्यात सुरू आहे. पणजीतील पाटो भागातील एका खासगी इमारतीत कार्यालयासाठी जागा खरेदी करण्यासाठी केलेला करार रद्द झाल्याची माहिती नोटिसीद्वारे बांधकाम कंपनीने दिली आहे. त्यामुळे स्वतःचे कार्यालय घेण्यासाठीही पक्षाकडे पैसे नसल्याचे दिसून आले आहे.
पाटो येथील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील जागेसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी संलग्न असलेल्या गोवा प्रदेश काँग्रेस समितीसोबत या जागेचा विक्री करार कंपनीने केला होता. परंतु, निर्धारित रक्कम भरण्यात पक्षाला अपयश आल्याने हा करार रद्दबातल करण्यात आल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. 29 ऑक्टोबर 2018 रोजी विक्री करार रद्द करण्यात आला होता, तर सहमती करार हा 26 ऑक्टोबर 2020 आणि 2 नोव्हेंबर 2020 रोजी संपुष्टात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे. .
पणजीतील काँग्रेस मुख्यालय जीर्णावस्थेत असल्याने पक्षाला नवीन कार्यालयाची गरज आहे. त्यासाठी पाटो-पणजी येथील एका प्रसिद्ध कंपनीच्या इमारतीत चौथ्या मजल्यावर जागा खरेदी करण्यासाठी पक्षाने 2017 साली कंपनीसोबत करार केला होता. त्याचे एकूण मूल्य सुमारे 5 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. कराराचा भाग म्हणून त्यावेळी डाऊन पेमेंटही देण्यात आले होते. आता काही वर्षांनंतर हा करार रद्द झाला असून, मूळ रक्कम देण्यासाठी पक्षाच्या तिजोरीत पैसे नसल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी ‘गोमन्तक’ला दिली
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.