Pay & Park Services in Goa: कोलवा आणि बाणावली समुद्र किनारी सरकारच्या पे पार्किंगचा सुरु करण्याच्या निर्णयाला येथील नागरिकांनी विरोध केलाय. कोलवा समुद्रकिनारी दुचाकी, चारचाकी, कार आणि मोटारसायकल पायलट यांनी सरकारच्या पे पार्किंगच्या सूचनेला विरोध केलाय.
समुद्रकिनारी जर पे पार्किंग सुरु केले तर त्याचे परिणाम येथील स्थानिकांच्या उद्योग व्यवसायावर होणार असून स्थानिक व्यावसायिक, शॅक मालक आणि वॉटर स्पोर्ट्स मालक यांनी सरकारच्या या निर्णयाचा निषेध केलाय.
सरकारच्या या निर्णयामुळे कोलवा आणि बाणावली समुद्र किनारी पर्यटकांची संख्या रोडवण्याची शक्यता आहे. तसेच येथील स्थानिकांच्या व्यवसायावर याचे दूरगामी परिणाम होणार आहेत.
कोलवा सर्कल येथील ऑटो रिक्षा मालक अरुण काळेकर यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया गोमंतककडे व्यक्त केली. ते म्हणाले, ''सरकारच्या या निर्णयाचा आमच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे.
तसेच पर्यटक या ठिकाणी न येता इतरत्र जातील आणि त्याचा परिणाम आमच्या सारखे रिक्षा चालक, मोटारसायकल पायलट यांच्या व्यवसायावर होणार आहे.
पे पार्किंगचा परिणाम समुद्रकिनारी शॅक व्यवसाय करणाऱ्या शॅक व्यावसायिकांवर देखील होणारआहे. आमची पर्यटन विभागाला विनंती आहे की, त्यांनी स्थानिकांच्या समस्या ऐकून मगच योग्य तो निर्णय घ्यावा''.
पे पार्किंगबाबत बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगास म्हणाले की, 'सरकार लोकांची मतं विचारात न घेता पे पार्किंगचा निर्णय लादत आहे.
सरकारला हा पे पार्किंगचा नियम जर लावायचाच असेल तर त्यातून स्थानिकांना सूट मिळणे गरजेचे आहे. पर्यटन विभागाने या बाबाबत ग्रामसभा घेऊन स्थानिकांची मतं विचारात घेणंही आवश्यक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.