Goa Budget 2024-25: अर्थसंकल्पासाठी सूचना आणि संकल्पना पाठवा, CM सावंतांचे गोवेकरांना आवाहन

Goa Budget 2024-25: गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 02 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे.
Goa Budget 2024-25
Goa Budget 2024-25Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Budget 2024-25: गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 02 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री डॉ. प्रमोद सावंत राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील.

2024-25 अर्थसंकल्पासाठी सूचना आणि संकल्पना पाठव्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमन्तकीयांना केले आहे.

गोवा सरकार 2024-25 च्या अर्थसंकल्पाची तयारी करत आहे. लोकाभिमुख अर्थसंकल्प तयार करण्यासाठी तुमच्या मौल्यवान संकल्पना आणि सूचना आम्हाला पाठवा.

नागरिकांना त्यांच्या सूचना आणि मते goabudget.gov.in किंवा goaonline.gov.in/budget या संकेतस्थळावर जाऊन शेअर करता येतील.

प्रत्येक गोमन्तकीयाच्या गरजा प्रतिबिंबित करणारा अर्थसंकल्प तयार करूया, असे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे.

Goa Budget 2024-25
Goa Budget 2024-25Dainik Gomantak

मुख्यमंत्री सावंत यांनी नमूद केलेल्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही यापूर्वी नोंदणी केली असल्यास मोबाईल नंबर टाकून ओटीपी द्वारे लॉगइन करु शकता किंवा नोंदणी करुन नंतर ओटीपी द्वारे लॉगइन करता येईल.

लॉग इन केल्यानंतर ज्या सरकारी विभागात तुम्हाला सूचना किंवा संकल्पना सुचवायची आहे तो विभाग निवडून त्याखालील रखाण्यात सूचना मांडता येईल.

त्यानंतर सबमिट बटणवर क्लिक केल्यानंतर तुमची सूचना नोंद केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com