Carnival 2024: पर्यटन खाते आणि मांद्रे उदरगत संस्था तसेच आमदार जित आरोलकर यांच्या सहकार्याने 12 व 13 फेब्रुवारी रोजी मांद्रे येथे कार्निवल उत्सव होणार असून त्याविषयी मांद्रे कार्निवल कमिटीने पत्रकार घेत कार्निव्हालबाबत माहिती दिलीय.
हा कार्निवल मागील 5 वर्षांपासून सुरु असून मांद्रेचे आमदार जीत आरोलकर तसेच समितीचे अध्यक्ष रॉबर्ट फर्नांडिस व अन्य सदस्यांनी यात खूप मोलाचा योगदान दिल्याचे उपस्थितांनी यावेळी सांगितले.
या कार्निव्हलची सुरुवात 2018 पासून झाली असून मागच्या वर्षी म्हणजेच 2023 साली मोरजी गावात हा कार्निवल साजरा झाला होता.
यंदा या फेस्टिवलचे आयोजन मांद्रेत करण्यात आलेले असून 12 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 वाजता सुरु कार्यक्रम सुरु होणार आहे. यात live music, dance शो यांचा समावेश असणार आहे.
तर 13 फेब्रुवारीला परेड, फॉल्ट असून किंग मोमो देखील सहभागी होणार आहे. यंदाच्या ट्रेडिशनल फॉल्टसाठी 12,5000 पासून बक्षीस सुरु असून मांद्रे आणि पेडणे मतदार संघातील सर्व धर्मियांनी या फेस्टिवलमध्ये सहभागी होण्याचे आवाहन कमिटीमार्फत करण्यात आले आहे.
दरम्यान कालच पणजीत होणाऱ्या कार्निवल साठी 6 स्पर्धकांमधून किंग मोमोची निवड करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.