Goa Budget 2024 : पणजी, अर्थसंकल्पात राजकीय नेत्याची छाप दिसणे आवश्यक असते. परंतु अर्थमंत्री या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज जो राज्याचा अर्थसंकल्प मांडला, त्यात तसेच काहीच दिसत नाही. ठोस निर्णय नाहीत. `
अर्थसंकल्पावर विशेष गोमन्तक टीव्हीच्या ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात नायक बोलत होते. संपादक-संचालक राजू नायक यांनी त्यांच्याशी संवाद साधला. क्रीडा संघटक संदीप हेबळे व प्रा. संजय देसाई यांनीही त्यात सहभाग घेतला.
अर्थसंकल्पात खाणी केव्हा सुरू होतील याबाबत निश्चित असे काहीच नाही. नारळ, काजू, सुपारी, मासळी आदींची उत्पादकांना कवडीमोल दराने किंमत मिळते. पर्यटन, बांधकामासंबंधी ठोस निर्णय नाहीत. राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील कोणाचे काही पडून गेलेले नाही. हा अर्थसंकल्प निराशाजनक आहे, असे दता नायक म्हणाले.
निधीचा योग्य विनियोग व्हावा : प्रा. संजय देसाई
मागील अर्थसंकल्प हा २५ हजार २५८ कोटींचा होता. यंदा त्यात १ हजार २०० कोटींची वाढ करण्यात आली आहे. दरडोई उत्पन्न ७ लाख आहे, जे राष्ट्रीय दरडोई उत्पन्नाच्या अनुषंगाने कितीतरी अधिक आहे.
जीडीपीमध्ये ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसते. यावरून एक आश्वासक चित्र निर्माण करण्यात आले आहे. परंतु सरकारी तिजोरीचा योग्य प्रकारे विनियोग होणे गरजेचे आहे. अन्यथा अनेक प्रकल्पांसाठी हजारो कोटी मोडून ते केवळ ‘पांढरे हत्ती’ ठरू नयेत याबाबत दक्षता घेतली पाहिजे, प्रा. संजय देसाई यांनी सांगितले.
अर्थसंकल्प खूपच निराशाजनक : दत्ता नायक
अर्थसंकल्पात खाणी केव्हा सुरू होतील याबाबत निश्चित असे काहीच नाही. नारळ, काजू, सुपारी, मासळी आदींची उत्पादकांना कवडीमोल दराने किंमत मिळते. पर्यटन, बांधकामासंबंधी ठोस निर्णय नाहीत.
राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील कोणाचे काही पडून गेलेले नाही. हा अर्थसंकल्प निराशाजनक आहे, असे दता नायक म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.