Panaji News : गेल्या अर्थसंकल्पातील बहुतांश आश्‍‍वासनांची सावंत सरकारकडून पूर्ती

Panaji News : गेल्या अर्थसंकल्पात, सरकारकडून ३९० घोषणा करण्यात आल्या, ज्यांची विविध क्षेत्रात अंमलबजावणी करण्यात आली आहे.
goa Budget 2024
goa Budget 2024 Dainik Gomantak
Published on
Updated on

Panaji News : पणजी, २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या आश्‍‍वासनांची संख्या ३९० होती.

३८८ (९९.४९%) अशा आश्वासनांबाबत एकंदर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे किंवा अंमलबजावणी सुरू आहे, तर २ (०.५१%) घोषणांशी संबंधित बाबी विविध प्रशासकीय कारणांमुळे एकतर वगळण्यात आल्या आहेत किंवा थांबवून ठेवण्यात आल्या आहेत.

आश्वासनपूर्तीत काही महत्वाच्या बाबी साकार झाल्या आहेत, त्या म्हणजे स्वयंपूर्ण गोवा बोर्डची स्थापना, सरकारकडून केंद्रीय पुरस्कृत योजना कक्षची स्थापना, आर्थिक क्षेत्रात महिती विश्लेषण कक्षाची स्थापना, पेटीएमबरोबर सामंजस्य करार, डीडीएसएसवाय उपभोक्त्यांसाठी गोमेकॉत खास कक्षाची स्थापना. अशा गेल्या अर्थसंकल्पात नमूद केलेल्या अनेक घोषणा पूर्ण करण्यात आल्या आहेत.

विद्युत विभागात, मांद्रे येथे ४० एमव्हीए सबस्टेशन, थिवी येथे ६३ एमव्हीए विद्युत ट्रान्‍सफॉर्मर, जलस्त्रोत विभागात १५० जलस्त्रोतांचे अमृत सरोवर योजनेखाली पुनरुज्जीवन, आंतरराज्य तिळारी जलसिंचन प्रकल्प, सांतिनेज नाला बांधणी ही काही महत्वाची कामे पूर्ण झाली आहेत.

goa Budget 2024
Goa Budget 2024: शिक्षण, सामाजकल्याण आणि कृषी खात्यासाठी कोणत्या महत्वाच्या घोषणा? जाणून घ्या तरतूदी

वाहतूक विभागात, ‘म्हंजी बस’ प्रकल्प, कदंब बसच्या सुविधा ॲपवर आणणे. क्रीडा विभागाने गेल्या वर्षी राष्ट्रीय क्रीडास्पर्धा घडवून आणल्या. ग्रामीण विकास विभागाखाली १६२ स्वयंसाहाय्य गटांची ग्रामीण भागात स्थापना.

पशुसंवर्धन विभागाअंतर्गत गोवा राज्य हे रेबीजमुक्त घोषित करण्यात आले. राज्यात शिंपल्यांची शेती करण्यास मत्स्यउत्पादन विभागाकडून चालना. समाज कल्याण विभागाकडून ''दिव्यांग सशक्तीकरण विभागाची'' स्थापना.

पर्यटन विभागाखाली राज्यात ''कॅरावान पॉलिसी'', ''होम-स्‍टे पॉलिसी'' अधिसूचित करणे. आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये जी-२० आंतरराष्ट्रीय परिषद झाली. आशी अनेक आश्वासने पूर्ण करण्यात आली.

३९० घोषणांची अंमलबजावणी

गेल्या अर्थसंकल्पात, सरकारकडून ३९० घोषणा करण्यात आल्या, ज्यांची विविध क्षेत्रात अंमलबजावणी करण्यात आली आहे. या ३९० घोषणांतून २ घोषणा, एक नगरविकास नियोजन विभाग आणि दुसरी सार्वजनिक बांधकाम विभागातील एक घोषणा टाळण्यात आली. 

या घोषणांतील २७९ कामे या चालीस लागल्या असून त्यांची पूर्तता लवकरच होणार आहे. एकूण ३८८ घोषणांमधली १०९ कामे पूर्ण झाली आहेत, असे आश्वासनपूर्तता अहवालात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com