Goa Forward च्या प्रयत्नांना यश! '30 मे पर्यंत मडगाव जिल्हा इस्पितळ सुसज्ज करा' - न्यायालयाचा आदेश

South Goa District Hospital: विजय सरदेसाई आणि पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी इस्‍पितळाला भेट देऊन तेथील सुविधांची पहाणी केली.
Vijai Sardesai
Vijai SardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

Bombay High Court order on Goa Forward's Public Interest Litigation: मडगावच्‍या दक्षिण गोवा जिल्‍हा इस्‍पितळातील वैद्यकीय सुविधा वाढवाव्‍यात अशी मागणी करुन गोवा फॉरवर्डने मुंबई उच्‍च न्‍यायालयात दाखल केलेल्‍या याचिकेत न्‍यायालयाने गोवा फॉरवर्डची मागणी उचलून धरताना 30 मे पर्यंत हे इस्‍पितळ सर्व सुखसोयींनी सज्‍ज करावे असा आदेश दिला आहे.

या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई आणि पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी काही नागरिकांसह या इस्‍पितळाला भेट देऊन तेथील सुविधांची पहाणी केली.

चांगली आराेग्‍य सेवा मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा मुलभूत अधिकार आहे. मात्र दक्षिण गोवा जिल्‍हा इस्‍पितळात सुविधा अभावी नागरिकांना याेग्‍य ती सेवा मिळत नव्‍हती.

त्‍यामुळेच हा प्रश्र्‍न आपल्‍याला न्‍यायालयापर्यंत न्‍यावा लागला. त्‍यानंतर न्‍यायालयाने जो निकाल दिला आहे तो एेतिहासिक स्‍वरुपाचा असून हा आपला नव्‍हे तर संपूर्ण दक्षिण गोव्‍यातील लोकांचा विजय आहे अशी प्रतिक्रिया सरदेसाई यांनी व्‍यक्‍त केली.

यावेळी प्रसार माध्‍यमांशी बोलताना सरदेसाई म्हणाले, 'जनतेला चांगली आरोग्य सेवा प्रदान करणे हे सरकारचे कर्तव्य आहे.

न्यायालयाने सरकारला 20 एप्रिलपर्यंत याचा अहवाल तयार करुन तो न्‍यायालयात सादर करण्‍याचा आदेश दिला आहे. या रुग्‍णांलयातील सर्व प्रलंबित काम 30 मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत असे सांगितले.

उच्‍च न्‍यायालयाने दिलेले निर्देश सरकार ठरलेल्‍या वेळेत पूर्ण करेल याकडे गोवा फॉरवर्ड पक्ष लक्ष देणार' असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com