Goa News: जागतिक भूक निर्देशांकात भारत देश '107' व्या स्थानी!

Goa News: देशाची समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेतील दरी भाजप सरकारच्या लोकविरोधी धोरणांमुळे निर्माण झाली आहे.
Goa News | Amit Patkar
Goa News | Amit PatkarDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र गौतम अदानी हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत, तर दुसरीकडे जागतिक भूक निर्देशांकात 2022 सालामध्ये भारत 121 देशांमध्ये 107 व्या क्रमांकावर आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारने हजारो टन तूरडाळ आणि साखरेची विल्हेवाट करून भारताच्या क्रमवारीसाठी एकप्रकारे योगदानच दिल्याचा सणसणीत टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी हाणला आहे.

पाटकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, देशाची समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेतील दरी भाजप सरकारच्या गेल्या आठ वर्षांतील लोकविरोधी धोरणांमुळे निर्माण झाली आहे. बेरोजगारीच्या दरात होणारी चिंताजनक वाढ, हेदेखील उपासमारीचे प्रमुख कारण आहे. देशात एका बाजूला श्रीमंत आणखी श्रीमंत होत असताना गरीब आणखी रसातळाला जात आहेत. याला भाजप सरकारची जनताविरोधी नीती कारणीभूत आहे, असे ते म्हणाले.

Goa News | Amit Patkar
Goa Government: सार्वजनिक व्यवहार क्रमवारीत गोवा चौथा; राजकीय न्यायामध्ये मिळालं शेवटचं स्थान

पंतप्रधानांच्या घोषवाक्याचा दुसरा भाग-

पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ असे घोषवाक्य प्रसारित केले होते. आज या घोषणेचा दुसरा भागही उजेडात आला आहे. गोवा, हरियाणा आणि इतर राज्यांतील भाजप सरकारांनीही पंतप्रधान मोदी यांच्या भांडवलदार मित्राला जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती बनवण्यात हातभार लावला. पण हजारो टन अन्नधान्य वाया घालवून भूक निर्देशांकात देशाला 107 व्या क्रमांकावर ढकलले, अशी टीकाही पाटकर यांनी केली आहे.

Goa News | Amit Patkar
Rape Case: धक्कादायक! जंगलात नेऊन 16 वर्षीय तरुणीवर बलात्कार; आरोपी गजाआड

भाजपचा गेम प्लॅन

राज्यात तूरडाळीसारख्या अन्नधान्याची नासाडी करण्यात आली. त्यामुळे यापुढे भाजपच्या गेम प्लॅनचा जनतेने विचार करावा. पर्यावरण (Environment), जंगल, वन्यजीव यांचा नाश करणाऱ्या मेगा प्रकल्पांचे प्रस्ताव पुढे ढकलण्यात मदत होण्यासाठी आमदारांना विकत घेण्यास हेच भांडवलदार भाजपला निधी देत ​​आहेत. मोलमजुरी करणारे गरीब मात्र या राजकीय डावपेचात उपाशी राहतो, असेही त्यांनी नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com