Goa: सुर्ला सत्तरीत विशेष कोविड लसीकरणाला मोठा प्रतिसाद

सत्तरी तालुक्यातील (Sattari) कर्नाटक (Karnataka) सिमेवर अगदी चोर्ला घाट माथ्यावर दूरवर ठिकाणी असलेल्या सुर्ला गावात (Surla) आज रविवारी विशेष कोविड लसीकरण (Covid 19) अभियान राबविण्यात आले.
Surla
Surla
Published on
Updated on

सत्तरी तालुक्यातील (Sattari) कर्नाटक (Karnataka) सिमेवर अगदी चोर्ला घाट माथ्यावर दुरवर ठिकाणी असलेल्या सुर्ला गावात (Surla) आज रविवारी विशेष कोविड लसीकरण (Covid 19) अभियान राबविण्यात आले. सुर्ला गाव हा डोंगुर्ली ठाणे पंचायत क्षेत्रात समाविष्ठ होतो. सुर्ला गाव सत्तरी तालुक्याच्या भागापासून लांब ठिकाणी असल्याने सर्व नागरिकांना (Citizens) वाळपईत टिका उत्सवाला, दररोजच्या लसीकरणाला येता येत नाही.

वाळपईत यायचे म्हणजे पन्नास किलोमीटर यावे लागते. काही दिवसांपुर्वी ठाणेत टिका उत्सव झाला होता. त्यावेळी बसची सोय केल्याने सुर्लाच्या काही लोकांनी लसीकरण करुन घेतले होते. पण बरेचसे वंचीत राहिले होते. म्हणूनच वाळपई आरोग्य केंद्राने आज विशेष लसीकरण अभियान सुर्ला गावातच राबविले. त्याचा मोठा फायदा सुर्ला गावच्या लोकांना झाला आहे. (Goa: Big response to special covid vaccination in Surla Sattari)

Surla
Goa vaccination : राज्य कोरोना मुक्त करण्याचे ध्येय

आज सुर्ला गावच्या जवळपास 218 जणांनी लसीकरण करुन घेतले आहे. यावेळी वाळपई आरोग्य केंद्राचे आरोग्यधिकारी डॉ. श्याम काणकोणकर (Dr. Shyam Kankonkar) डाँ. अभीजीत वाडकर, डाँ.विदेश जल्मी, व्यवस्थापक अकीब शेख, सुलभा सावंत, कविता गावस, विराज सावंत, कासकर, सिया म्हाऊसकर, रिमा चावडीकर, भक्ती गावस, अलिशा भट, संगिता गावस, अस्मिता गावकर, पोर्णिमा गावकर, निर्मला गावस, प्रियंका गावकर, दीपा गावडे, सरिता काळे, संजना गावस, अल्जिरा, यशवंत गावकर, नामदेव गावस, प्रतिक्षा सामंत, फोंडू पर्येकर आदी आरोग्य केंद्राची संपुर्ण संघच दिवसभर उपस्थित राहिली होती.

दिवसभर आज सुर्लात कोविड लसीकरण अभियान (Covid Vaccination Campaign) राबविण्यात आले. यावेळी स्थानिक पंच तथा ठाणेचे उपसरपंच सुर्यकांत गावकर उपस्थित होते. त्यांनी वाळपई आरोग्य केंद्राचे अभिनंदन करीत कोवीड लसीकरणासाठी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. या लसीकरणात जेष्ठ व्यक्तींनीही मोठा सहभाग घेतला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com