Kala Academy Scam: कला अकादमी घोटाळा याचिकेत दुरुस्ती करण्यास खंडपीठाची मान्यता

गेल्या महिन्यात अकादमीच्या खुल्या मंचचे छत कोसळले होते
Kala Academy Slab Collapsed
Kala Academy Slab CollapsedDainik Gomantak

Kala Academy Scam Petition: राजधानी पणजीतील कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या बांधकामामधील निविदेतील घोटाळाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात अंतिम सुनावणीसाठी प्रलंबित असलेल्या याचिकेत अकादमीचे छत कोसळण्याची माहिती देणारी दुरुस्ती करण्यास सादर केलेल्या अर्जाला मान्यता देताना मूळ याचिकेवरील सुनावणी लवकर घेण्यासाठी केलेला अर्ज नाकारला आहे.

त्यामुळे अंतिम सुनावणी न्यायालयाच्या पटलावरील वेळेनुसार होणार आहे.

Kala Academy Slab Collapsed
Leopard In Mulgao : लोकवस्‍तीत घुसून, कुत्र्याला घेऊन बिबट्याची धूम; मुळगावातील प्रकार

गेल्या महिन्यात कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या बांधकामाचे काम सुरू असताना रात्रीच्या सुमारास तेथील खुल्या मंचचे छत कोसळले होते. याप्रकरणीच्या तपासणीसाठी सरकारने एका आयआयटीच्या तज्ज्ञांना आमंत्रित केले होते.

मात्र त्यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे सरकारने पर्यायी आयआयटी तज्ज्ञांची शोधाशोध चालवली आहे. याचिकादार दुर्गादास कामत यांनी या याचिकेत कोसळलेल्या छताची माहिती देण्यास दुरुस्ती करण्यासाठी विनंती केली होती.

त्याला खंडपीठाने परवानगी दिली आहे. या घटनेमुळे या बांधकामामध्ये झालेला घोटाळा उघडकीस आला आहे, असे खंडपीठाच्या दुरुस्तीद्वारे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

...वेळेनुसार सुनावणी!

ही जनहित याचिका दाखल करून घेऊन ती अंतिम सुनावणीसाठी खंडपीठाने ठेवली आहे. ही सुनावणी लवकर घेण्यासाठीही अर्ज करण्यात आला.

मात्र ही सुनावणी यापूर्वीच अंतिम सुनावणीस ठेवण्यात आल्याने ती वेळेनुसार सुनावणीला येईल, ती घेतली जाईल, त्यासाठी या अर्जाची आवश्‍यकता भासत नाही, असे स्पष्ट करून ही विनंती नाकारण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com