Goa Belgaum Road News : गोवा बेळगाव महामार्गावर पूल खचला; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु

पावसाची संततधार सुरु असल्याने ठिकठिकाणी दरड तसेच पूलाला तडे जाण्याच्या घटना समोर येत आहेत.
Goa Belgaum Road News
Goa Belgaum Road NewsDainik Gomantak
Published on
Updated on

goa belgaum road news : पावसाची संततधार सुरु असल्याने गोवा बेळगाव महामार्गावर पूलाचा भाग खचल्याची घटना घडली आहे. त्यामुळे हा महामार्ग वाहतूकीस बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान, शनिवारी सायंकाळी बेळगाव ते गोव्यादरम्यानच्या चोर्ला घाटात कंटेनर व प्रवासी बस यांच्यात अपघात झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

Goa Belgaum Road News
RDX असलेला टँकर येत होता गोव्याच्या दिशेने, मुंबई पोलिसांच्या माहितीनंतर रत्नागिरीत कारवाई

याबाबत अधिक माहिती अशी की, गोवा-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील लोंढाजवळील नवीन बांधलेला पूल खचल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पूलाच्या परिसरातील राष्ट्रीय महामार्गाला तडे गेले आहेत.

या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर वाहनचालकांना त्रास होवू नये म्हणून प्रशासनातर्फे पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com