Goa Assembly: सभागृह कामकाजातून उपप्रश्न डिलीट केल्याने आलेमाव भडकले; त्वेषाने हातातील कागदपत्रे दिली फेकून

Yuri Alemao: गोवा विधानसभा अधिवेशनाचा आजचा 15 वा दिवस आहे. आज (2 ऑगस्ट) अधिवेशनाच्या कामजाचाची सुरुवात होताच गदारोळ पाहायला मिळाला.
Goa Assembly: सभागृह कामकाजातून उपप्रश्न डिलीट केल्याने आलेमाव भडकले; त्वेषाने हातातील कादपत्रे दिली फेकून
Yuri AlemaoDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा विधानसभा अधिवेशनाचा आजचा 15 वा दिवस आहे. आज (2 ऑगस्ट) अधिवेशनाच्या कामकाजाची सुरुवात होताच गदारोळ पाहायला मिळाला. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव चांगलेच संतापलेले दिसले. आलेमाव यांनी अगदी त्वेषाने बोलण्यास सुरुवात केली. कारणही तसचं होतं. सभागृहाच्या कामकाजातून तारांकित प्रश्नाचे उपप्रश्न डिलीट केल्याने आलेमाव भडकले. सत्ताधारी आमदार आणि युरी आलेमाव आमनेसामने आले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आलेमाव यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. तर दुसरीकडे, आपला मुद्दा आक्रमकरित्या मांडत आमदार विरेश बोरकर विधानसभेच्या हौदात पोहोचले.

दरम्यान, तारांकित प्रश्नाचे उप प्रश्न सभागृहाच्या कामाकाजातून डिलीट करण्यात आले. यावरुन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव सत्ताधारी आमदार यांच्यात खडाजंगी झाली. सत्ताधारी आणि विरोधी आमदार यांच्यातील वाढता गोंधळ पाहता विधासभा सभापती रमेश तवडकर यांनी मध्यस्थी करत यावर तोडगा काढण्यात येईल असे सांगितले.

Goa Assembly: सभागृह कामकाजातून उपप्रश्न डिलीट केल्याने आलेमाव भडकले; त्वेषाने हातातील कादपत्रे दिली फेकून
Goa Assembly: गोमेकॉतील ओपीडी गोदामे मी स्वच्छ केली! आरोग्यमंत्री राणेंची कोपरखळी

सभापतींच्या मध्यस्थीनंतरही आलेमाव शांत झाले नाहीत. उपप्रश्न डिलीट करण्यात आल्याने विरोधी पक्षनेते युरी आलेमाव चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. त्यांना राग अनावर झाला नाही. आपल्या हातातील कादगपत्रे त्यांनी त्वेषाने खाली फेकून दिली. पाच उपप्रश्न डिलीट करण्यात आल्याने आलेमाव भडकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com