Goa Assembly Today News: विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात खडाजंगी; वाचा दिवसभरातील अपडेट्स

आमच्या मतदारसंघात आम्ही सोलर पॅनलसाठी एक दोन नाही तर तीन लाख स्क्वेअर मीटर जमीन देण्यास तयार.
Goa Assembly Today News: 'आम्ही तीन लाख स्क्वेअर मीटर जमीन देण्यास तयार...,' फळदेसाईंचं विधानसभेत आवाहन
Published on
Updated on

'आम्ही तीन लाख स्क्वेअर मीटर जमीन देण्यास तयार, मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा'

आमच्या मतदारसंघात आम्ही सोलर पॅनलसाठी एक दोन नाही तर तीन लाख स्क्वेअर मीटर जमीन देण्यास तयार. मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा. कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाईंचे विधानसभेत आवाहन.

कार्यालयात बसून राहणाऱ्या जेईंना कामाला लावा!

वीज खात्याचे जेई (JE) वीज कार्यालयांमध्ये बसून असतात त्यांना कामाला लावा. आमोणा ते वाळपई Over Head HT Lines भूमीगत करा. पर्येच्या आमदार डॉ.देविया राणेंची मागणी‌.

विधानसभेच्या आवारात डेंग्यूला आमंत्रण?

गोवा विधानसभेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. मात्र विधानसभेच्या पाठिमागच्या बाजूच्या कॅंटीन शेजारील गटार आणि चेंबर तुंबले. पाणी जाण्यास वाट नाही. हे पाणी खूप दिवसांचे असल्याने डेंग्यूची लागण होण्याची शक्यता.

प्रामाणिक ग्राहकांनी त्यांचा भार का सोसायचा? निलेश काब्राल यांनी केली 'ही' मागणी

राज्यातील 80 ते 85 टक्के विज ग्राहक नित्यनेमाने प्रामाणिकपणे विज बिले भरतात. मात्र उरलेले 10 ते 15 टक्के विज ग्राहक विज बिले भरत नसल्याने त्यांचा हा भार नियमित विजबिल भरणाऱ्या ग्राहकांनी का सोसायचा? विजबिले न भरणाऱ्या ग्राहकांना प्रिपेड विज मिटर देण्याची मागणी आमदार निलेश काब्राल यांनी सभागृहात केली.

...तर गोवा का अशी यंत्रणा उभी करु शकत नाही? मायकल लोबोंचा सवाल

नवीन आणि अक्षय उर्जेसाठी जर शेजारील राज्य व्यवस्था उभी करु शकते तर गोवा का करु शकत नाही? मंत्र्यांनी सभागृहासकट सर्व सरकारी कार्यालयांमध्ये सोलर पॅनल बसवून सर्व जनतेला नवीन व अक्षय उर्जेचा एक संदेश द्यावा, अशी मागणी आमदार मायकल लोबो यांनी सभागृहात केली.

सत्तरीत पावसाचं धूमशान; पूरस्थितीवर आमदार देविया राणेंकडून चिंता व्यक्त

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं धूमशान घातलं आहे. सत्तरीत आज सकाळपासून पाऊस सुरु झाला आहे. सध्या सत्तरीत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पर्येच्या आमदार डॉ. देविया राणे यासंबंधी विधानसभेत बोलताना चिंता व्यक्त केली. यावेळी त्यांनी डब्ल्यूआरडी खात्याने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजनेची मागणी केली.

राज्यात काजूच्या उत्पादनात घट, आमदार जीत आरोलकर यांच्याकडून लक्षवेधी

राज्यात काजूच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. आमदार जीत आरोलकर यांच्याकडून विधानसभेत लक्ष्यवेधी काळात मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कृषी संचालकांना लक्ष घालण्यास सांगतो असे म्हणाले.

राज्यात औषधांची अजिबात कमतरता नाहीये, आम्ही फक्त...; विश्वजित राणे

राज्यात औषधांची मोठी कमतरता असल्याच्या प्रश्नावर आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले की, राज्यात बिलकुल औषधांची कमतरता नाही. जिवनशैलीवर परिणाम झाल्यामुळे डायबेटिस आणि रक्तदाबाचे रुग्ण वाढतायेत. आम्ही फक्त इन्सुलिन मोफत देऊन थांबत नाही तर त्याचा डोस कसा कमी होईल यावरही भर देत देतो.

राज्यात डॉक्टरांची मोठी कमतरता; आमदार रेजिनाल्ड

आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी राज्यातील डॉक्टरांच्या कमतरतेचा मुद्दा विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. रेजिनाल्ड यांच्या प्रश्नावर आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले की, राज्याबाहेरील डॉक्टर गोव्यात सेवा देण्यास तयार आहेत, मात्र त्यासाठी धोरणात बदल करण्याची गरज आहे.

राज्यातील आरोग्य केंद्रे रुग्णांना सुविधा देण्यात अपयशी; आलेमावांच्या आरोपाला कामतांचा दुजोरा

राज्यातील सामाजिक आणि प्राथमिक (PHC & CHC) आरोग्य केंद्रे रुग्णांना योग्य सुविधा देण्यास अपयशी ठरल्याने जीएमसीवर ताण येतोय. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या आरोपाला गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार दिगंबर कामत यांनीही दुजोरा दिला.

डिचोली आरोग्य केंद्रात स्टाफची कमतरता, OT झालेय गोदाम!

डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. ऑपरेशन थिएटर असून ते सुरु नाहीये. ते गोदाम बनल्याची माहीती डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्याकडून विधानसभेत देण्यात आली.

नीट पेपर फुटीचा मुद्या काल (31 जुलै) गाजला

गोवा विधानसभाल पावसाळी अधिवेशनाचा आजचा 14 वा दिवस आहे. काल म्हणजेच 31 जुलै रोजी नेट पेपर फुटीच्या मुद्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात घमासान पाहायला मिळाले. याशिवाय, राज्यातील अनेक मुद्यांवरुन खडाजंगी झाली. दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने स्थिती अधिकच हालाखीची बनत चालली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com