Goa Assembly: ''गोव्यात लोक किड्यामुंग्यांसारखे मरतायेत, अपघातांच्या घटनांमध्ये कमालीचे वाढ''; आलेमाव यांचा घणाघात

Yuri Alemao: राज्यातील अपघात काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीयेत. सातत्याने अपघाताच्या घटना समोर येतायेत. पावसाळा सुरु झाल्यापासून तर अपघातांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे.
Goa Assembly: ''गोव्यात लोक किड्यामुंग्यांसारखे मरतायेत, अपघातांच्या घटनांमध्ये कमालीचे वाढ''; आलेमाव यांचा घणाघात
Yuri AlemaoDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यातील अपघात काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीयेत. सातत्याने अपघाताच्या घटना समोर येतायेत. पावसाळा सुरु झाल्यापासून तर अपघातांच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे राज्यात अपघातांच्या घटना वाढल्याचे सांगत विधानसभेचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सरकारवर निशाणा साधला होता.

यातच आता, आलेमाव यांनी या मुद्यावरुन अधिवेशनादरम्यान पुन्हा एकदा सरकारवर टीकास्त्र डागले. आलेमाव म्हणाले की, ''राज्यात अपघातांचे सत्र वाढले आहे. लोक किड्यामुंग्यांप्रमाणे मरत आहेत. यावर्षी जानेवारी ते एप्रिलपर्यंत 852 रस्ते अपघात झाले, ज्यामध्ये 99 लोकांना आपला जीव गमवावा लागला.''

दरम्यान, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनीही राज्यातील वाढते अपघात रोखण्यासाठी सरकार काय उपाययोजना करत आहे यासंबंधी प्रश्न विचारला होता. ज्यावर राज्‍यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी सरकार तातडीने दीर्घकालीन अशा उपायोजना करत आहे. त्यात काही ठिकाणी नव्याने रस्ते बांधण्याचाही समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली.

Goa Assembly: ''गोव्यात लोक किड्यामुंग्यांसारखे मरतायेत, अपघातांच्या घटनांमध्ये कमालीचे वाढ''; आलेमाव यांचा घणाघात
Goa Assembly: आदिवासींचे प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढणार; सर्वेक्षणाला देणार गती

मुख्यमंत्री सावंत म्हणाले?

अपघातप्रवण क्षेत्रे कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या कामांचा तिमाही पद्धतीने आढावा घेण्यात येतो. फलक लावणे, गतिरोधक घालणे, रस्तारुंदीकरण करणे ही कामे तातडीने करण्‍यात येतात. तर, धोकादायक वळणे कापून काढणे, पर्यायी रस्ता करणे आदी दीर्घकालीन उपाययोजना असतात. या दोहोंच्या मदतीने अपघात कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com