Goa Budget Live Updates: सावंत सरकारच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य गोवेकरांसाठी काय?

राज्याचा 2022-23 चा अर्थसंकल्प विधानसभेत मांडणार, पुढील अधिवेशनात चर्चा होणार
Goa Budget 2022-23 Live Update
Goa Budget 2022-23 Live UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात आज विधानसभेत अर्थसंकल्प (Goa Budget) सादर होत आहे. रोजगार संधी, पर्यटन आणि साधन सुविधांची निर्मिती करणारा, खनिज उद्योग आणि कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देणारा राज्याचा 2022-23 चा अर्थसंकल्प राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) सादर करणार आहेत. सांवंत सरकारच्या (Goa Government) या अर्थसंकल्पात सर्वसामान्य जनतेसाठी काय सुविधा असणार आहे हे बघायला मिळणार आहे.

  • अर्थसंकल्प सादर करत असताना सर्वच गोष्टी दिलेल्या कालावधीमध्ये सादर करणं शक्य नसल्याचे सांगत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनतेला 'भिवपाची गरज ना' म्हणत गोवेकरांना आशेचे किरण दिले.

  • गोव्यावर कोणताही अतिरिक्त कर लावला जाणार नाही : मुख्यमंत्री

  • पोर्तुगीजांनी नष्ट केलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार आणि पुनर्निर्माण करण्यासाठी सरकारतर्फे 20 रु. कोटींचा निधी मंजूर

  • पत्रकार कृतज्ञता योजनेंतर्गत 20 लाखांची तरतूद

  • गोवा पोलिसांसाठी 980 रू. कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

  • 2022 च्या अर्थसंकल्पामध्ये वनविभाग खात्याला 154 कोटींचे अनुदान

  • संवेदनशील नदीकाठावर पूर परिस्थिती निवारणासाठी 100 रु. कोटी निधी मंजूर.

  • सरकारी कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना - स्वेच्छानिवृत्ती योजना राबविण्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद.

  • रेशन दुकानांचे आर्थिक व्यवहार्यतेसाठी रूपांतर केले जाईल

Summary
  • साळगाव येथे मध्यवर्ती बियाणे बँकेची स्थापना करण्यात येणार आहे

  • राज्यातील कॅसिनो ऑपरेशन्स नियमांसाठी नवीन नियम

  • गृह खात्याला अर्थसंकल्पामध्ये 1188 रू. कोटींचा निधी मंजूर.

  • गोव्यात लवकरच 'वेस्ट टू आर्ट पार्क' (Waste to Art Park)

  • उच्च शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू होणार

  • स्टेट रिसर्च फाउंडेशनची स्थापना केली जाणार

  • एनआयटी (NIT)मध्ये मे 2022 पासून नवीन कॅम्पस सुरू होणार

  • नागरी विकास विभागाला 567 रु. कोटी मंजूर

  • नागरी विकास विभागाला 567 रु. कोटी मंजूर

  • वर्षाला 3 LPG सिलिंडर मोफत मिळणार असून त्यासाठी 40 कोटींचा निधी मंजूर

  • वर्षाला 3 LPG सिलिंडर मोफत मिळणार

  • गोव्याचा 2022-23 या वर्षीचा अर्थसंकल्प जाहीर करत असताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्वात प्रथम बंद असलेला खाण व्यवसाय सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.

  • महागाई, बेरोजगारी या प्रमुख समस्या

  • गोव्याचा 2022-23 या वर्षीचा अर्थसंकल्प जाहीर करत असताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्वात प्रथम बंद असलेला खाण व्यवसाय सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.

  • गोव्याच्या 60व्या मुक्ती दिनानिमित्त केंद्र सरकारकडून गोव्याला 150 कोटींचे अनुदान मिळाले असून या अनुदानातून प्रत्येकी 1 कोटी राज्यातील सर्व नगरपालिकांना देण्यात येणार असून पंचायतीला 50 लाख वितरीत करण्यात येणार आहेत; आम्ही स्वयंपूर्ण धोरण राबवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत

  • राज्याचा 2022-23 अर्थसंकल्पामध्ये गोव्यासाठी एकूण 24,467 कोटी बजेट असणार आहे: मुख्यमंत्री

  • दरमहिना 16000 लीटर मोफत पाण्याची योजना सुरु राहणार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

  • आरोग्यविभागासाठी एकूण 1972कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले असून हे अनुदान 12.6 टक्क्यांनी वाढले आहे.

  • सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय विमा सुरू करण्यात आला आहे.

  • मडगावच्या घाऊक मासळी बाजारासाठी राज्य सरकारतर्फे 15 कोटी रु. अनुदान जाहीर करण्यात आले आहे.

  • सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 2099 कोटी रुपये जाहीर करण्यात आले.

  • गोव्यात पाणी पुरवठ्यासाठी 721 कोटी रु. देण्यात आले आहेत.

  • यावर्षीच्या अर्थसंकल्पात गोव्यात 5 जलशुद्धीकरण प्लांटचे नियोजन केले आहे.

  • इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीसाठी 25 कोटींचा निधी

  • GMC आणि दक्षिण गोव्यातील रुग्णालयात 2 अतिदक्षता विभाग लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.

  • GSIDC मध्ये विविध प्रकल्पांसाठी 372 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

  • राज्यभरात वाढीव पाणी बिलांमुळे प्रचंड गदारोळ माजला होता. वाढीव पाणी बिलांचा मुद्दा सोडवण्यासाठी 1 दिवस राखीव ठेवण्यात येणार असून त्यादिवशी या मुद्द्याचे निराकरण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले .

  • स्वयंपूर्ण गोवा 2.0 योजना लॉन्च केली जाणार, ज्यात नागरिकांना घरबसल्या विविध सेवांचा लाभ घेता येणार

  • सरकारी कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा निवृत्ती योजना आणणार, 10 कोटींची तरतूद

  • गोवा कर्मचारी आरोग्य विमा योजना लवकरच अमलात आणणार

  • इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीसाठी 25 कोटींचा निधी

  • राष्ट्रीय महामार्गासाठी केंद्राकडून या अर्थसंकल्पात 12000 कोटी देण्यात आले आहेत.

  • उद्योग, खाणी क्षेत्रांसाठी 340 कोटींचा निधी

  • मोपा लिंक रोड कार्यान्वित करण्यासाठी 1883 कोटी रुपयांचा निधी मंजूर

  • मायक्रो फूड सेक्टरसाठी 250 स्वयंसहाय्यता बचत गटांना मदत

  • पाणी साठवणुकीच्या प्रकल्पांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर

  • नवीन गृहकर्ज व्याज अनुदान योजनेसाठी 20कोटींचा निधी.

  • दुर्गम भागातील शाळांना जोडण्यासाठी सरकारकडून मोठा निधी

  • 100 इलेक्ट्रिक बसेस लवकरच सुरू करणार असून मडगाव आणि पणजी मध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा असलेले बसस्टँड तयार करण्यात येणार आहे

  • गोव्यातील युवकांना स्वयंरोजगारासाठी सरकार योजना आणणार

  • शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज

  • साळ नदीच्या निर्जलीकरणाचा पाहिला टप्पा पूर्ण

  • जलवाहतुकीसाठी वापरात असलेल्या सर्व जुन्या फेरी बोट बदलून त्याऐवजी सौर संकरित बोटी सुरू करण्यात येणार आहेत.

  • निधी वाटपामध्ये राज्याच्या वीजवितरण खात्याला 3250 रू. कोटींचे अनुदान प्राप्त झाले आहे.

  • रुफटॉप सोलर पॉवर युनिट्ससाठी 50% सबसिडी

  • गोव्यात प्रत्येक जिल्ह्यात 50 खाटांचं आपत्कालीन सेवा पुरवणारे रुग्णालय बांधणार

  • कौशल्य विकासासाठी 114 कोटी रुपयांचे वाटप.

  • महिला आणि बालकल्याण विभागासाठी 434.34 कोटींची तरतूद

  • तसेच 85.87 लाडली लक्ष्मी, ममता योजनेअंतर्गत 10000 रुपये मुलगी झाल्यास मिळणार

  • शिक्षणासाठी गोवा सरकारकडून 3850.98 कोटींची तरतूद

  • राज्यातील शाळांमध्ये विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा सुरू करणार असून सर्व शाळांमध्ये कोडिंग आणि रोबोटिक्ससाठी 21.86 कोटींची तरतूद

  • शिक्षकांच्या सर्व रिक्त जागा भरणार, शिक्षकांसाठी सामायिक परीक्षा सक्तीची करणार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com