Goa Agriculture: ट्रॅक्टरचालकांची कमतरता शेतीसाठी समस्या ; मायकल लोबो

Shortage of tractor drivers: पर्रा पंचायत सभागृहात स्थानिक शेतकऱ्यांना मोफत बियाणे आणि खतांचे वाटप करण्याच्या कार्यक्रमात लोबो बोलत होते.
ट्रॅक्टरचालकांची कमतरता शेतीसाठी समस्या ; मायकल लोबो
Michael LoboDainik Gomantak

बार्देश, ट्रॅक्टर चालकांची टंचाई ही सध्या कृषी क्षेत्रासमोरील सर्वात मोठी समस्या आहे, असा दावा कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केला. तसेच युवकांनी कृषी क्षेत्रात करिअर करावे, असे आवाहन त्यांनी केले.

पर्रा पंचायत सभागृहात स्थानिक शेतकऱ्यांना मोफत बियाणे आणि खतांचे वाटप करण्याच्या कार्यक्रमात लोबो बोलत होते.

पर्रा येथील शेतीला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल. बियाणे, खतांव्यतिरिक्त मोफत कापणी यंत्रही उपलब्ध करण्यात येईल, असे लोबो पुढे म्हणाले.

पर्राचे उपसरपंच डॅनिअल लोबो यांनीही पंचायतीकडून शेतकऱ्यांना सर्व मदत करण्यात येईल, असे सांगितले. सरपंच चंदू हरमलकर आणि इतर पंच यावेळी उपस्थित होते.

ट्रॅक्टरचालकांची कमतरता शेतीसाठी समस्या ; मायकल लोबो
Goa Agri Societies: गोव्यातील कृषी सोसायट्याही विकू शकतील पेट्रोल, एलपीजी, औषधे...

कळंगुट पंचायतीच्या ठरावाचे स्वागत

दरम्यान, पर्यटकांकडून प्रवेश कर आकारण्यासंदर्भातील कळंगुट पंचायतीच्या ठरावाचे लोबो यांनी स्वागत केले. पंचायतीचा हा चांगला निर्णय असल्याचे ते म्हणाले. विधानसभा अधिवेशनात आपण हा मुद्दा उपस्थित करणार आहे. बेशिस्त पर्यटकांवर कारवाई होणे आवश्‍यक आहे, असे लोबो म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com