Mopa Airport : पेडणेतील संस्कृतीला तिलांजली! यंदा थेट ‘मोपा’ वर सनबर्न आयोजनाचा घाट?

गुप्त बैठका ः ‘जीएमआर’नेही हिरवा क़ंदील दाखवल्याची चर्चा
Mopa Airport
Mopa AirportDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी : पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेले आणि दरवर्षी जगाचे लक्ष वेधून घेणारी सनबर्न पार्टी यंदा मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टवर आयोजित करण्याचा डाव आखला जात आहे. त्यामुळे पेडणे तालुक्यातील संस्कृतीला तिलांजली देण्याचे काम आयोजक करत असून त्यांना सरकारचे पाठबळ मिळत आहे,अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवाय ‘जीएमआर’ कंपनीही मोपा विमानतळ जागेत ‘सनबर्न’ला हिरवा कंदील दाखवत असल्याने त्यासंबंधीच्या गुप्त बैठकाही झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. this year organize sunburn party manohar international airpot

पेडणे तालुका इथली देव देवता, ऐतिहासिक किल्ले, ऐतिहासिक स्थळे, देवतांची मंदिरे आणि पेडणे कोजागिरी पौर्णिमा, गावागावात साजरा होणारा दसरोत्सव, शिगमोत्सव भजन, कीर्तन नाट्य ही पेडणे तालुक्याची संस्कृती आहे. मात्र, आता सरकार भोगसंस्कृतीकडे नेणारे सनबर्न, कॅसिनो यासारखे प्रकल्प तालुक्यात आणू पाहत आहे.

त्याचाच भाग म्हणून ज्या पार्टी वर जगभरातील पर्यटकांचे लक्ष असते. ती सनबर्न दरवर्षी अंजुना, वागातोर या ठिकाणी २८,२९,३० डिसेंबर असे तीन दिवस असते. यंदा ही पार्टी मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टवर करण्याचा घाट आयोजकांनी घातल्याची माहिती मिळाली आहे.

Mopa Airport
Morjim News : दिव्यांग व्यक्तीकडून वाहतुकीला अडथळा; पोलिसांनी असा काढला तोडगा

मोपा विमानतळासाठी आवश्यक जमिनीपेक्षा कितीतरी पट जास्त जमीन संपादित करून ‘जीएमआर’कडे सुपूर्द केली. उर्वरित जागेत वेगवेगळे प्रकल्प उभे राहणार आहेत. त्यात तारांकित हॉटेल,साधन सुविधा मॉल सुपर मार्केट, शिवाय मनोरंजन सिटी, बरोबरच त्या जागेमध्ये संनबर्न सारख्या पार्टीला थारा देण्यात साठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

Mopa Airport
Morjim News : मोरजीत स्थानिक पंच सदस्य विलास मोरजे यांनीच बुजवले रस्त्यांवरील मोठे खड्डे

‘मोपा’वर लोकोत्सव व्हावा !

या मोपा विमानतळावर ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. त्यांना नोकऱ्या नाहीत, भरपाई नाही, टॅक्सी व्यवसाय सुद्धा नाही. शिवाय टॅक्सीचा प्रश्न मग तो येलो ब्लॅक असो किंवा ब्लू टॅक्सी स्टँड असो, हा विषय आजही अधांतरी आहे. सरकारने दरवर्षी पेडणे तालुक्यासाठी लोकोत्सव विमानतळावर आयोजित करावा. आणि तिथे स्थानिकांना रोजगार संधी द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com