Goa Accident Death: चिंताजनक! रस्‍त्‍यावर 42 जणांना मृत्‍यू

Goa Accidents Death in 2024: 56 दिवसांतील आकडेवारी : प्रत्‍येक 32 व्‍या तासाला एकाचा जातो जीव
Goa Accident Death
Goa Accident DeathDainik Gomantak

Goa Accident Death:

सुशांत कुंकळयेकर

गोव्‍यातील रस्‍ते जीवघेणे ठरू लागले आहेत. मागच्‍या 56 दिवसांत गोव्‍यातील रस्‍त्‍यांवर 43 जणांचा अपघातांत बळी गेला असून हे प्रमाण पाहिल्‍यास दर 32 व्‍या तासाला गोव्‍यात रस्‍त्‍यावर एकाचा बळी जात असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. यावर उपाय म्‍हणून आता राज्‍यात सार्वजनिक स्‍वरूपाची व्‍यापक जागृती होण्‍याची गरज व्‍यक्‍त केली जात आहे.

जानेवारी 1 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत गोव्‍यात 40 अपघातांत 42 जणांचा जीव गेला आहे. त्‍यात 31 मोटरसायकल स्‍वारांचा समावेश आहे. मोटरसायकलच्‍या मागे बसलेल्‍या चार व्‍यक्‍ती दगावल्‍या आहेत.

अन्‍य वाहनांच्‍या दोन चालकांचा तसेच रस्‍त्‍याने चालून जाणाऱ्या दोन पादचाऱ्यांना अपघातात मृत्‍यू आला असून एक सायकलस्‍वार आणि एका बस प्रवाशाचा या बळींमध्‍ये समावेश आहे. सध्‍या ‘गोव्‍यात वाहतूक जागृती मास’ चालू असताना अपघाती मृत्‍यूचे प्रमाण वाढले असून या पार्श्र्वभूमीवर हे प्रमाण कमी करायचे असेल तर शासनाने लोकांमध्‍ये जागृती आणण्‍याची व्‍यापक मोहीम हाती घेण्‍याची गरज आहे,

Goa Accident Death
Petrol Subsidy: पेट्रोल अनुदान योजनेसाठी 3.49 कोटी रुपये मंजूर

असे मत गोवा कॅनचे निमंत्रक रोलंड मार्टिन्‍स यांनी व्‍यक्‍त केली. गोमन्‍तक टीव्‍हीच्‍या ‘साश्‍‍टीकार’ या कार्यक्रमात त्‍यांनी आपले हे मत व्‍यक्‍त केले. गोमन्‍तकचे ब्‍युरो चीफ सुशांत कुंकळयेकर यांनी ही मुलाखत घेतली.

ड्रायव्‍हर नसताना पर्यटकांना गाडी चालवायला देणे चुकीचे: चर्चिल

गोव्‍यात मागच्‍या काही दिवसांत जे अपघात झाले आहेत त्‍यातील काही अपघातात रेंट अ कार आणि रेंट अ बाईक घेऊन प्रवास करणारे पर्यटक कारणीभूत ठरले आहेत. याकडे बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव यांनी लक्ष वेधताना, वाहनांबरोबर ड्रायव्‍हर नसताना पर्यटकांना ती चालविण्‍यास देणे चुकीचे असून रेंंट अ कार हा प्रकार बंद करून त्‍याजागी रेंट अ टॅक्‍सी ही संकल्‍पना पुढे आणण्‍याची गरज व्यक्‍त केली.

Goa Accident Death
Space Mission: अंतराळात 2035 पर्यंत भारतीय अंतरिक्ष स्टेशन

सर्वोच्‍च न्‍यायालयाने यासंबंधी जी समिती नेमली आहे त्‍या समितीने देशात होणाऱ्या प्रत्‍येक अपघाताचे विश्‍‍लेषण करणे सक्‍तीचे केले असून त्‍यासाठी पोलिस स्‍थानकाच्‍या निरीक्षकावर ही जबाबदारी दिली आहे. वाहतूक खात्‍याच्‍या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन हे विश्‍‍लेषण करणे आवश्‍‍यक आहे. मात्र, गोव्‍यात याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही, असे जाणवले आहे.

- रोलंड मार्टिन्‍स, निमंत्रक, गोवा कॅन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com