Water Bill Scam: भाजप सरकारने पाण्याच्या बिलांवरून पद्धतशीरपणे घोटाळा केल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार अमित पालेकर (Amit Palekar) यांनी शनिवारी केला आहे.
यावेळी पालेकर म्हणाले, 200 युनिटखालील पाण्याच्या बिलांवर दुप्पट, तिप्पट आणि चौपट प्रमाणात रक्कम आकारली आहे. अशाप्रकारे महिन्याला 3 ते 4 कोटी रुपये सरकारला (Goa Government) मिळतात, तर वर्षाला 30 ते 40 कोटी रुपये सरकारकडे जातात. मंत्र्यांची आर्थिक प्रगती पाहता लोकांच्या खिशातून जाणारा पैसा नक्की कुठे जातो, हे लक्षात येते, असा आरोप पालेकर यांनी केला आहे.
वाढीव पाणी बिलांबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी ‘आप’ने आरटीआय अर्ज दाखल केला. त्यातून असे दिसून आले की, राज्यातील अनेक ग्राहकांच्या शुल्कात पाचपट वाढ होत आहे. ज्या ग्राहकांना 200 रुपये बिल मिळायला हवे होते, त्यांना 1 हजारांचे बिल देण्यात आले.
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना पालेकर म्हणाले, कालापूर आणि सांत इनेज येथील रहिवाशांची पाण्याची बिले आमच्या हाती लागली आहेत. आरटीआयच्या उत्तराने मुख्यमंत्री (Pramod Sawant) आणि त्यांचा सार्वजनिक बांधकाम विभाग किती अकार्यक्षम आहे, हे उघड झाले आहे. युनिटच्या रिडिंगमध्ये त्रुटी आहेत आणि लोकांना पाण्याची वाढीव बिले मिळत आहेत, असे त्यांनी सांगितले.
उदाहरण क्र. 1 : बिल क्रमांक 4040186 हे सांत इनेज येथील रहिवाशाचे आहे. ज्याचे पूर्वीचे रिडिंग 1 होते आणि त्याचे वर्तमान वाचन 0 आहे. त्याच्याकडून 50 युनिटसाठी 442 रुपये आकारले आहेत. सांत इनेजमधील आणखी एक रहिवाशाचा बिल क्रमांक 4110193 आहे, त्याचे पूर्वीचे रिडिंग 1707 होते आणि त्याचे वर्तमान रिडिंग 1753आहे. त्याच्याकडून 50 युनिटसाठी 2248 रुपये आकारले, तर प्रत्यक्ष वापरलेले युनिट्स 46 असल्याचे समोर आले आहे, असे पालेकर म्हणाले.
उदाहरण क्र. 2 : बिल क्रमांक 14640221 हे सांत इनेज येथील रहिवाशाचे आहे. ज्याचे पूर्वीचे रिडिंग 1845 होते आणि त्याचे वर्तमान रिडिंग 0 आहे आणि 270 रुपये थकबाकी आहे. त्याच्याकडून 68 युनिटसाठी 871 रुपये आकारले आहेत. बिल क्रमांक 145880223 याचे पूर्वीचे वाचन 2016 होते आणि त्याचे वर्तमान रिडिंग 0 आहे आणि 6181 रुपये थकबाकी आहे. त्याला 69 युनिट्साठी 6662 रुपये आकारले आहेत, अशी माहिती पालेकर यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.