Tiswadi News : फ्रान्सिस सिल्वेरांचे शक्तिप्रदर्शन; सांतआंद्रेत नवे भाजप मंडळ गठित

Tiswadi News : कार्यकर्त्यांत संचारली नवी ऊर्जा
Tiswadi
Tiswadi Dainik Gomantak
Published on
Updated on

Tiswadi News : तिसवाडी, लोकसभा निवडणूक जवळ येत असून राजकीय हालचाली वेग घेत असून सांतआंद्रेचे माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी काल आपल्या राजकीय बळाचे शक्ती प्रदर्शन केले.

सांतआंद्रे भाजप मंडळ गठित करण्यानिमित्त विधानसभा निवडणुकीनंतर पहिला भव्य असा कार्यक्रम आयोजित झाला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावल्याने सांतआंद्रेतील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नवी ऊर्जा संचारली आहे.

दीड वर्षानंतर नवीन भाजप मंडळ गठित झाले असून प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या हस्ते नवीन मंडळ अध्यक्ष आनंद वेर्लेकर यांना पदभार देण्यात आला. कार्यक्रमाला सांतआंद्रेचे माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, सांतआंद्रेचे भाजप प्रभारी सिद्धार्थ कुंकळ्येकर, आगशीचे माजी सरपंच झेवियर ग्रासिएस व इतर मान्यवर उपस्थित होते.

Tiswadi
Goa Mining: नेसाय येथे खडीच्या भुकटीचे ट्रक रोखले

२०२२ विधानसभा निवडणुकीत भाजपला सांतआंद्रे मतदारसंघ जिंकता आला नाही, तरी देखील मतदारसंघातील विकास सुरूच आहे. याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचे आभार व्यक्त करतो.

सांतआंद्रेतील नवीन भाजप मंडळ गठित केले असून सर्व जणांनी एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे. मंडळ मिळाल्याने आम्ही लोकसभा निवडणुकीसाठी जोमात तयारी करूया, केवळ नवीन मंडळ अध्यक्ष आनंद यांच्यावरती सर्व जबाबदारी टाकून चालणार नाही, असे आवाहन फ्रान्सिस सिल्वेरा यांनी केले.

सांतआंद्रे भाजप मंडळ असे

अध्यक्ष आनंद वेर्लेकर, सरचिटणीस झेवियर ग्रासिएस आणि शशिकांत नाईक, सचिव महेश सावंत, महिला अध्यक्ष डियोना कोरगावकर, प्रवक्ते अजित बकाल आणि शशिकांत सावंत व अन्य सदस्य मंडळींचा मंडळाच्या कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आला आहे. सांतआंद्रे मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांना सरकारच्या योजनासंबंधी माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.

जगातील सर्वात मोठा पक्ष भाजप असून या पक्षाचा सांतआंद्रेतील मंडळ अध्यक्ष निवड झाल्याने आनंद होत आहे. अटल सेतू आणि नवीन झुवारी पूल बांधून भाजपने विकास कसा केला जातो, हे दाखवले आहे.

माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी सांतआंद्रेच्या विकासासाठी काम केले असून आता लोकसभा निवडणुकीतही आम्ही भाजपला आघाडीवर आणले पाहिजे. मतदारसंघात पक्षाचा आमदार नसूनही कामे होत आहेत.

-आनंद वेर्लेकर, मंडळ अध्यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com