गोव्याच्या बाजारात मासळी महागली

मासळी बाजारात मासळीची आवक कमी झाल्‍यामुळे दर वाढले आहेत.
goa fish market
goa fish marketDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मासळी बाजारात मासळीची आवक कमी झाल्‍यामुळे दर वाढले आहेत. वातावरणातील बदल व समुद्रात वेगाने वाहत असलेले वारे यामुळे काही ट्रॉलर्स समुद्रात गेलेले नाहीत. परिणामी गोव्‍याला महाराष्‍ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू येथील मासळीवर गोव्‍याला अवलंबून रहावे लागत आहे.

goa fish market
सावधान! गोव्याच्या तापमानातही होतेय वाढ

पणजी (panaji) बाजारात आज पापलेट, इसवण यांचे दर वाढल्‍याचे दिसून आले. पापलेटचा दर प्रतिकिलो 1200 रूपयांपर्यंत असून इसवण 900 ते 1000 रूपये किलो विकला जात आहे. गेल्या आठवड्यात तारली व बांगड्याच्या किमतीत घट झाली होती. मात्र आता या दोन्‍ही मासळींच्‍या दरात वाढ झाली आहे. ती प्रतिकिलो 200 रुपये दराने विकली जात आहे. कोळंबी, खेकडे, कर्ली, कोमेखापी, खुबे, लेपो आदी मासळीचे दरही वाढलेले आहेत. त्‍यामुळे लोक मासळीऐवजी चिकन खरेदी करणे पसंत करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com