Bicholim News : कृष्णानगर-डिचोली येथे माळरानाला आग; अग्निशमन दलाची तत्परता

Bicholim News : त्वरित आग विझविल्याने अनर्थ टळला
Bicholim
Bicholim Dainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim News :

डिचोली, बोर्डे - डिचोली येथील कृष्णानगर भागात भर लोकवस्तीला टेकून असलेल्या माळरानाला आग लागण्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, डिचोली-साखळी रस्त्यावरील कुळण आणि व्हाळशी येथील आयटीआयच्या मागच्या बाजूने माळरानालाही आग लागण्याची घटना घडली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन्ही ठिकाणी लागलेली आग वेळीच नियंत्रणात आणली. आज सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आग नेमकी कशी लागली, त्याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

मात्र, आग लागताच कृष्णानगर वसाहतीतील लोकांवर आकांत आला. आग लागल्यानंतर सर्वत्र धूर आणि आगीच्या ज्वाला पसरल्या होत्या. सकाळची वेळ असल्याने आग भडकली नाही. त्यामुळे मदतकार्य करताना अडचण आली नाही.

Bicholim
Goa Crime News: तरुणीची अश्‍लील छायाचित्रे प्रसारित केल्याने गुन्हा

‘अग्निशमन’कडून मदतकार्य

डिचोली अग्निशमन दलाला या आगीची माहिती मिळताच लिडींग फायर फायटर प्रल्हाद देसाई यांच्या नेतृत्वाखाली दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

जवानांनी जवळपास तासभर मदतकार्य करून आग आटोक्यात आणली. विठ्ठल परब (चालक), विष्णू राणे आणि रुपेश पळ या जवानांनी मदतकार्यात सहभाग घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com