FC Churchill Brothers News: 'फिफा'ने चर्चिल ब्रदर्स क्लबवरील बंदी उठवली...

खेळाडुंना पगार न दिल्याने घातली होती बंदी
FIFA Lifts Ban On FC Churchil Brothers:
FIFA Lifts Ban On FC Churchil Brothers:Dainik Gomantak
Published on
Updated on

FIFA Lifts Ban On FC Churchill Brothers: गोव्यातील सुप्रसिद्ध चर्चिल ब्रदर्स फुटबॉल क्लबवर 'फिफा'ने 7 ऑगस्ट रोजी बंदी घातली होती. क्लबकडून खेळणाऱ्या खेळाडूंना पगार न दिल्याने फिफा ने ही कारवाई केली होती. तथापि, फिफाने क्लबवरील बंदी आता उठवली आहे.

क्लबने त्यांचे जे काही देणे होते ते सर्व चुकते केले आहे, त्यामुळे बंदी उठवल्याचे फिफाने म्हटले आहे. तसे पत्र फिफाने क्लबला पाठवले आहे. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनलाही हे पत्र पाठवले गेले आहे.

FIFA Lifts Ban On FC Churchil Brothers:
Mahadayi Water Issue: 'म्हादई'साठी कर्नाटकात सर्वपक्षीय एकी; पर्यावरण परवान्यासाठी केंद्रीय मंत्र्यांची घेणार भेट...

या पत्रात म्हटले आहे की, क्लब ज्या लोकांचे देणे लागत होता, त्यांचा हिशेब क्लबने चुकता केलेला आहे. त्याची दखल घेत फिफाने क्लबवरील बंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे.

माजी मुख्यमंत्री आणि चर्चिल ब्रदर्स क्लबचे चर्चिल आलेमाव यांनी यापुर्वी थेटच सांगितले होते की, माझ्याकडे पैसे नाहीत. तथापि, तरीदेखील त्यांनी क्लबसमोरील पैशांची अडचण नक्की सोडवू, असा विश्वास व्यक्त केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com