Goa Marathi Academy: ‘अभिरूप न्यायालया’ चे वेगळेपण भावले; उपस्थितांनी केले कौतुक

संमेलन : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विठ्ठल ठाकूर यांची न्यायाधीशाची भूमिका
Goa News
Goa NewsDainik Gomantak

गोवा मराठी अकादमी आयोजित साहित्य संमेलनात ‘अभिरुप न्यायालय’ किंवा प्रती न्यायालय अशा स्वरूपाच्या संकल्पनेवर आधारीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम उपस्थितांना चांगलाच भावला.

या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. अजय वैद्य, पत्रकार अवित बगळे, ज्येष्ठ कीर्तनकार विवेक जोशी, लेखिका अदिती बर्वे यांना प्रती न्यायालयात प्रश्‍न विचारण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विठ्ठल ठाकूर यांनी न्यायाधिशाची तर निवेदक गोविंद भगत यांनी वकीलाची भूमिका पाडली

यावेळी वैद्य म्हणाले, मला रंगभूमीची आवड असून देखील वैद्यकीय शिक्षण घेतले कारण माझ्या वडिलांची तशी इच्छा होती. राज्यातील निवेदकांना आता सूगीचे दिवस आले आहे. परंतु ही सूत्रसंचालकांची बैठक बसविण्यासाठी गेली 20 वर्षे आपण राज्यभर कार्यक्रम केले आहेत.

कोरोना काळात बाहेरून सूत्रसंचालक आणणे शक्य नव्हते त्यावेळी गावातील युवकांनी सूत्रसंचालने केली. त्या निवेदकांना आता काही प्रमाणात अधिक अभ्यास करण्याची गरज आहे. या कार्यक्रमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला

चर्चासत्रे रंगली, युवकांचा प्रतिसाद

अरुणोदय हा कथा, कविता, वकृत्‍त्व आणि नाट्य अभिवाचनाचा आविष्कार हा युवा मराठी विद्यार्थ्यांचे कार्यक्रम रंगला तेस मराठी साहित्यिकांची स्मरणचित्रे यात जेष्ठ समीक्षक डॉ. सोमनाथ कोमरपंत यांचे मराठी साहित्यिकांची स्मरणचित्रे या कार्यक्रमाला रसिकांनी दाद दिली. या सत्राचे निवेदन प्रा. पूर्वा वस्त यांनी केले होते.

भालेरावांच्या कानपिचक्या-

भालेराव यांनी समारोपाच्या भाषणात काही सूचना देखील केल्या. आपली कविता सादर करून झाली की इतरांच्या कविता ऐकायच्या नाहीत, निघून जायचे किंवा केवळ आपल्या मित्रांच्या कविता ऐकाव्यात, असे होता कामा नये. असे कवी कधी मोठे होत नाहीत. कवीने कवितेचा मान करणे गरजेचे आहे. तसेच जर नाणं खणखणीत असेल तर आपली दखल नक्की घेतली जाते. कविता ही स्वांतसुखाय लिहायची असते. पुरस्कार ही दुय्यम गोष्ट असते, अशा कानपिचक्या त्यांनी दिल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com