Fatorda News : विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे हे शिक्षकांचे कर्तव्‍य : दत्ता नायक

Fatorda News : महिला व नूतन हायस्कूलच्या सभागृहात गोकुळदास शिरोडकर ट्रस्टतर्फे कार्यक्रम
Fatorda
Fatorda Dainik Gomantak
Published on
Updated on

फातोर्डा, कुठलाही विद्यार्थी हा शिक्षणात ‘ढ’ नसतो. तो कुठल्या ना कुठल्या विषयात, त्याच्या आवडत्या क्षेत्रात अग्रेसर असतो. विद्यार्थ्यांचे हे गुण शोधून शिक्षकांनी त्यांना उत्तेजन दिल्यास विद्यार्थी आपले भविष्य उज्ज्वल करतील, असे मत उद्योजक दत्ता नायक यांनी व्यक्त केले.

महिला व नूतन हायस्कूलच्या सभागृहात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. गोकुळदास शिरोडकर ट्रस्टतर्फे महिला व नतून हायस्कूलच्या ज्येष्ठ शिक्षकांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.

Fatorda
Goa Legislative Assembly : वसुलीविना वेदांताला निर्यात परवानगी; खाणप्रश्‍नावरून युरी आक्रमक

त्यावेळी व्यासपीठावर अमेय शिरोडकर, अनुया शिरोडकर, सुनील नाईक, रिचा कामत, संध्या सरदेसाई आदी उपस्थित होते. यावेळी दत्ता नायक, सुनील नाईक, संध्या सरदेसाई आणि अनुया शिरोडकर यांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

आपल्या आवाजात कोमलता असावी, चेहऱ्यावर स्मित हास्य असावे, देहबोली चांगली असावी, इतरांशी चांगल्याप्रकारे बोलावे, आपले कपडे नीटनीटके असावेत, आपली चूक असेल तर लगेच माफी मागावी. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या आवडीप्रमाणे नव्हे, तर स्वतःला हवे असलेले क्षेत्र निवडावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे लाडके बनण्याचा प्रयत्न करावा. - दत्ता नायक, उद्योजक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com