Panjim News: ‘आबे फारिया’ रस्त्यावरील नाले तुंबले; घरांमध्ये घुसले पाणी

Abbe Faria Road: आमदारांकडून झाडांच्या फांद्या कापण्याचे, नाले स्वच्छ करण्याचे आदेश
Abbe Faria Road: आमदारांकडून झाडांच्या फांद्या कापण्याचे, नाले स्वच्छ करण्याचे आदेश
Abbe Faria Panjim Dainik Gomantak

शुक्रवारी सकाळी मुसळधार पाऊस पडल्याने आबे फारिया रस्त्यावरील नाल्यातील पाणी तुंबून काही घरांमध्ये पाणी शिरले. लगेच मडगावचे आमदार दिगंबर कामत, स्थानिक नगरसेवक सगुण नायक यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यानंतर नाले स्वच्छ करण्याचे तसेच रस्त्यावर आलेल्या झाडांच्या धोकादायक फांद्या कापण्याचे आदेश दिले.

यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई तसेच राष्ट्रीय महामार्ग खात्याचे कर्मचारी उपस्थित होते.

स्थानिकांनी सांगितले की, रस्त्यावर चोवीसही तास वाहतूक सुरूच असते. मात्र, या रस्त्याच्या दोन्ही बाजूने झाडे वाढलेली आहेत. फांद्या रस्त्यावर आलेल्या आहेत व कधीही या झाडांच्या फांद्या पडण्याची शक्यता आहे.

गेल्या शनिवारी याच रस्त्यावर भला मोठा वृक्ष उन्मळून पडला व जवळजवळ चार तास वाहतूक खंडित करण्यात आली. एका वाहनाची मागील भागाची काच फुटली हे सोडल्यास सुदैवाने मोठी हानी झाली नाही. मात्र, आता ज्या फांद्या रस्त्यावर येत आहेत, त्या कापणे आवश्यक असल्याची आमची मागणी आहे.

Abbe Faria Road: आमदारांकडून झाडांच्या फांद्या कापण्याचे, नाले स्वच्छ करण्याचे आदेश
Panjim News: खाडीतील पाणीसुद्धा गटारांतून रस्‍त्‍यावर; पाटो परिसराची डोकेदुखी

दिगंबर कामत, आमदार

आबे फारिया रस्ता हा मडगावमधील रहदारीचा प्रमुख रस्ता असल्याने नाले स्वच्छ करणे तसेच धोकादायक झाडांच्या फांद्या कापणे गरजेचे आहे. त्यानुसार आपण संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना कामांची माहिती दिली. रस्त्याच्या दोन्ही बाजूचे नाले तुंबलेले असल्याने पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे हे नाले स्वच्छ करण्यास राष्ट्रीय महामार्ग खात्याला सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com