Crime News : दोनापावला येथे कॅसिनो जुगारावर छापा; 12 जण अटक

Crime News : रोख रकमेसह 36 लाखांचे साहित्य जप्त
 Casinos
CasinosDainik Gomantak
Published on
Updated on

Crime News : पणजी, वायंगिणी व्हॅली - दोनापावला येथील ऑनलाईन चान्सिस कॅसिनोमध्ये परवाना नसताना सुरू असलेल्या पत्त्याच्या जुगारावर क्राईम ब्रँचने मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकून १२ जणांना अटक केली.

या छाप्यावेळी त्यांच्याकडून ३६ हजारांची रोख रक्कम, ३६ लाखांचे जुगाराचे साहित्य तसेच इतर इलेट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले. गोवा सार्वजनिक जुगार कायद्याच्या कलम ३ व ४ खाली गुन्हा दाखल करण्यात आला.

दोनापावल या भागात गेल्या काही महिन्यांपासून बेकायदेशीर कॅसिनो जुगार सुरू असल्याची माहिती क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्याना मिळाली होती.

त्यानुसार पोलिस निरीक्षक किशोर रामनान यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने हा छापा टाकला. यावेळी तेथे त्यावेळी दहा ग्राहक पत्त्यांचा जुगार खेळत होते तसेच या कॅसिनोचा व्यवस्थापक व एक कर्मचारी होता.

 Casinos
Goa Recruitment: राज्य कर्मचारी आयोगामार्फतच होणार भरती : मुख्यमंत्री सावंत

या कारवाईवेळी तेथील ल लाईव्ह पत्ते खेळण्याचे १ टेबल, ६ लॅपटॉप, १ लाईव्ह कार्ड शफलर, १ कार्ड स्कॅनर, २ मॉनिटर, १ कॅश चिप फ्लोट असे मिळून सुमारे ३६ लाख २५० रुपयांचे साहित्य तसेच रोकड जप्त करण्यात आली.

सर्व संशयितांच्या विरोधात गोवा सार्वजनिक जुगार कायद्याच्या कलम ३ व ४ खाली गुन्हे नोंद करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com