दोनापावला जेटीवर मंत्री बाबूश आणि विरोधी आमदार यांच्यात हमरीतुमरी; व्यावसायिकांच्या प्रश्नांचे पडसाद

पर्यटकांची संख्या कमी झाल्याने येथील आमच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे होते.
दोनापावला जेटीवर मंत्री बाबूश आणि विरोधी आमदार यांच्यात हमरीतुमरी; व्यावसायिकांच्या प्रश्नांचे पडसाद
Published on
Updated on

Dona Paula Jetty: दोनापावला येथील जेटीवर जाण्यासाठी कंत्राट दिले आहे, तेथे तिकीट आकारले जात आहे. बसेस जेटीवर पोहोचत नाहीत, त्यामुळे जेटीवर येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. त्याचा परिणाम येथील पारंरपरिक व्यावसायिवर होत असल्याच्या विषयाला गुरुवारी तोंड फुटले होते.

मात्र, त्याचे पडसाद आज राजकीय पटलावर उमटल्याचे दिसून आले. काँग्रेसचे आमदार विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, एल्टन डिकॉस्ता, कार्लस फेरेरा व प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी जेटीला भेट दिल्यानंतर सत्ताधारी गटाचे आमदार तथा महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात हेही तेथे पोहोचल्यामुळे त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

दोनापावला जेटीचे नूतनीकरण झाल्यानंतर पर्यटकांना तेथे जाण्यासाठी पर्यटन खात्याने तिकीट आकारणी सुरू केली. तेथे कंत्राटदार नेमण्यात आला. त्या कंत्राटदाराने लहानग्यांसाठी 25 आणि मोठ्यांना 50 रुपये तिकीट आकार ठेवला. त्याचे पडसाद अगोदरच उमटले. कंत्राटदार कंपनीच्या महिला प्रतिनिधीशी येथील व्यावसायिकांनी वाद घातला.

पर्यटकांची संख्या कमी झाल्याने येथील आमच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचे त्यांचे म्हणणे होते. याची दखल घेत काँग्रेसच्या आमदार व प्रदेशाध्यक्षांनी आज दुपारी दोनापावला जेटी गाठली. त्याठिकाणी पाहणी केली करून अर्धातास होतोय तोच पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी त्याठिकाणी आपल्या लवाजम्यासह धाव घेतली.

आमदार झाल्यापासून आपण येथील व्यवसायिकांच्या पाठीशी आहोत, त्यांचे प्रश्न आणि समस्या सोडविण्यास आपण समर्थ आहोत, असे बाबूश यांनी सांगितले.

प्रवेशद्वार खुले होणार नाही !

येथील प्रवेशद्वार खुले करावे, अशी मागणी व्यवसायिक महिलांनी लावून धरली. त्यावर बाबूश यांनी प्रवेशद्वार खुले करता येणार नाही. हा भाग पर्यटन खात्याच्या देखरेखेखाली येतो. आम्हाला ते प्रवेशद्वार नकोच म्हणून महिलांनी तगादा लावला.

पर्यटकांना तिकीट आकारण्याविषयी निविदा काढली होती, त्यानुसारच त्यांनी 25 व 50 रुपये पर्यटकांकडून घेतात. कोणत्याही बाहेरील व्यक्तीला येथे व्यवसाय करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे मोन्सेरात यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com