'देखो अपना देश' संकल्पनेअंतर्गत गोवा ते देहरादून थेट विमानसेवा; पर्यटनमंत्री खंवटेंची माहिती

पर्यटन माहिती केंद्राला टुरिस्ट हब असे संबोधले जाणार
Rohan Khaunte
Rohan KhaunteDainik Gomantak

'देखो अपना देश' ही नवी संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आहे. या संकल्पनेअंतर्गत गोवा थेट डेहराडून राज्याशी जोडले जाणार आहे. देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी या दोन्ही ठिकाणांहून थेट उड्डाणे उपलब्ध होणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिली. खात्यातील अधिकाऱ्यांसमवेत आज बैठक आयोजित करण्यात आली होती.

Rohan Khaunte
Sonsodo Project : 15 टीपीडी बायोमिथेनेशन प्रकल्पाची वर्षभरात उभारणी करणार

"देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी गोवा व डेहराडून या दोन्ही ठिकाणांहून थेट विमानसेवा उपलब्ध होणार आहे. यासाठी जीएमआर आणि इंडिगो यांनी करार केला आहे. यामुळे दोन्ही ठिकाणांवरील आंतरराष्ट्रीय पर्यटकांना भ्रमंती करण्यास सोपे जाईल. यासंदर्भात सामंजस्य करार करण्यासाठी गोव्यातील एक पथक डेहराडूनला रवाना होणार आहे" असे पर्यटनमंत्री खंवटे यांनी सांगितले.

"दर्जेदार पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन विभागाकडून योग, स्वास्थ्य, आंतरग्रामीण पर्यावरण आणि आध्यात्मिक पर्यटनावर भर दिला जाईल. सल्लागार KPMGला काही मुद्दे समाधानकारक नसल्यामुळे टुरिझम मास्टर प्लॅन आणि पर्यटन धोरण पुन्हा तयार करण्यास सांगण्यात आले आहे. पर्यटन मंत्र्यांनी त्यांच्या ONM भागीदारांसह समुद्रकिनारे आणि पार्किंगवर स्वच्छतागृहांच्या आढावा घेतला तसेच केसरवळ झरा विकसित करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली."

"पर्यटन माहिती केंद्राला टुरिस्ट हब असे संबोधले जाईल. या ठिकाणी पर्यटकांना सर्व सुविधा एकाच छताखाली पुरविल्या जातील. या हबमध्ये पर्यटकांना गोव्याची आवश्यक माहिती तसेच स्वच्छतागृहे, शॉवर क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, पोलिसांसाठी, चेंजींग रूम्स इत्यादी सुविधा मिळतील." असे सांगितले. सहा महिन्यांची थकबाकी न भरल्याबद्दल टॉयलेट कंत्राटदारांना पर्यटनमंत्र्यांनी झापले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com