Ganesh Chaturthi 2023 : ‘उडाण’ कार्यक्रमात विशेष मुलांकडून भक्तिगीतांचा आविष्कार

‘उडाण’ कार्यक्रमात विशेष मुलांकडून भक्तिगीतांचा आविष्कार
dicholi keshav seva sadhana school student
dicholi keshav seva sadhana school student Dainik Gomantak
Published on
Updated on

Ganesh Chaturthi 2023 : डिचोली येथील सार्वजनिक गणेशोत्सवात ‘उडान’ हा विशेष मुलांचा कराओके गायनाचा कार्यक्रम फारच रंगला. विशेष मुलांनी मंगलमूर्ती गणपती बाप्पासमोर भक्तीगीते गाऊन आविष्काराचे दर्शन घडवितानाच उपस्थितांना अचंबीत केले.

सोमवारी (ता. २५) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाविन्यपूर्ण संकल्पनेतील हा कार्यक्रम होता.

या कार्यक्रमप्रसंगी नगराध्यक्ष कुंदन फळारी, नगरसेवक विजयकुमार नाटेकर, अनिकेत चणेकर, ॲड. रंजना वायंगणकर, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रसाद नाटेकर, विशेष शाळेच्या मुख्याध्यापिका संजना प्रभुदेसाई, अध्यक्ष मकरंद कामत आदी उपस्थित होते.

dicholi keshav seva sadhana school student
Ganesh Festival : बाप्पाच्या निरोपानंतर डिचोली बाजारात मत्स्यखवय्यांची गर्दी ; काय आहे भाव ? जाणून घ्या...

डॉ. मंजीरी दत्तप्रसाद जोग यांच्या मार्गदर्शनाखाली डिचोलीतील केशव सेवा साधना या शाळेतील रुद्रेश गाड, विभा काणेकर, यश कळंगुटकर यांनी भक्तीगीते सादर करून उपस्थितांकडून दाद मिळवली.

प्रोत्साहनासाठी सहकार्याचे आवाहन

विशेष मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना व्यासपीठ मिळावे. ही ‘उडान’ कार्यक्रमामागील संकल्पना आहे असे डॉ. मंजिरी जोग यांनी सांगितले.

विशेष मुलांचा आत्मविश्वास वाढावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी समाजातील घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ. जोग यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com