Ganesh Festival : बाप्पाच्या निरोपानंतर डिचोली बाजारात मत्स्यखवय्यांची गर्दी ; काय आहे भाव ? जाणून घ्या...

सुरमईचा दर 800 ते 900 रुपये किलो होता. कोळंबी आकाराप्रमाणे 400 ते 600 रुपये किलो होती. मुड्डशे 800 रुपये तर पापलेट 600 रुपये किलो होती. बांगडे, खेकडे 300 रुपये प्रति किलो होते.
surmai rate
surmai rateDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली : पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्याने रविवारी येथील मासळी बाजारात मासळी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी उसळली.

श्रावण मासापासून पाच दिवसांचा गणपती उत्सव होईपर्यंत ''शिवराक'' पाळलेल्या मत्स्यखवय्यांनी मोठ्या प्रमाणात मासळी घरी नेऊन त्यावर ताव मारला.

डिचोलीसह विविध ठिकाणी मासळी विक्रेत्यांकडे खरेदीसाठी गर्दी होती. डिचोली बाजारात सर्व प्रकारची मासळी उपलब्ध होती.

डिचोलीसह विविध ठिकाणी मासळी विक्रेत्यांकडे खरेदीसाठी गर्दी होती. डिचोली बाजारात सर्व प्रकारची मासळी उपलब्ध होती.

भावात वाढ

गेला महिनाभर मासळी बाजारात पाय न ठेवलेल्या मत्स्यखवय्यांना रविवारी मासळी बरीच महाग असल्याचा अनुभव आला त्यात सुरमईचे दर ऐकताच अनेकांच्या कपाळाला आट्या पडत होत्या. 

सुरमईचा दर ८०० ते ९०० रुपये किलो होता. कोळंबी आकाराप्रमाणे ४०० ते ६०० रुपये किलो होती. मुड्डशे ८०० रुपये तर पापलेट ६०० रुपये किलो होती. बांगडे, खेकडे ३०० रुपये प्रति किलो होते.

surmai rate
Goa Ganesh Chaturthi 2023: पाच दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com