Dhargal Bridge : धारगळ उड्डाणपुलाचा विषय पुन्हा तापणार; १८ रोजी सभा

Dhargal Bridge : मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासन देऊनही न पाळल्याने ग्रामस्थांत नाराजी
Dhargal Bridge
Dhargal BridgeDainik Gomantak

Dhargal Bridge : बार्देश, धारगळ दोनखांब येथील महामार्गावर अपघातांचे सत्र चालूच आहे. येथे उड्डाणपूल उभारण्याची मागणी ग्रामसभेत वारंवार केली गेली.

याची दखल घेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे येऊन वर्षभरात उड्डाणपूल बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे येत्या रविवारी (ता. १८) सकाळी ९.३० वाजता धारगळ पंचायत सभागृहात जाहीर सभा घेऊन पुढील निर्णय घेण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

सरपंच अर्जुन कानोळकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. यावेळी उपसरपंच दीप्तीशा नारोजी, पंच प्रीती कानोळकर, अनिकेत साळगावकर, सतीश धुमाळ, दिलीप वीर, प्रदीप (भूषण ) नाईक व सचिव लोरेन्सो रिबेरो उपस्थित होते. निरीक्षक म्हणून गटविकास कार्यालयातील अर्जुन परब उपस्थित होते. सरपंच कानोळकर यांनी स्वागत केले.

प्रारंभी सचिवांनी विकास कामांचा अहवाल सादर केला. यावेळी सीसीटीव्हीवर बरीच चर्चा झाली. नवीन वीज ट्रान्स्फॉमर, पाण्याच्या टाक्या, स्मशानभूमी, रस्ते, गटार व इतर विषयांवर चर्चा झाली.

उड्डाणपुलाच्या विषयावरून ग्रामसभेमध्ये गदारोळ झाला. ग्रामस्थांनी पंचायत मंडळाला धारेवर धरले. गेल्या ग्रामसभेमध्येही यावर चर्चा झाली होती. परंतु सरकारने काही उपाययोजना केली नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. या ठिकाणी वारंवार अपघात होतात. अनेक जण मृत्यूमुखी पडलेले आहेत.

Dhargal Bridge
Goa Drugs Case: राज्यात ड्रग्ज तस्करीत वाढ; विदेशी नागरिकांसह स्थानिक युवकांचा सहभाग

तसेच अनेकांचे हातपाय मोडलेले आहेत. मात्र येथे उड्डाणपूल उभारण्याबाबत सरकार कोणीही दखल घेत नसल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली. अनिल कुंडाईकर, रोहिदास हरमलकर, मुरारी परब, वैभव नाईक, आवेलीन रॉड्रिगीस, पुंडलिक धारगळकर, प्रकाश धुमाळ,

भारत बागकर, सर्वेश कारापूरकर, नीलेश राऊळ, नीलेश म्हापसेकर, नाना हरमलकर, विराज कांबळी, साईश नाईक आदी ग्रामस्थांनी चर्चेत भाग घेतला. पंच सतीश धुमाळ यांनी आभार मानले.

धारगळ : १) उड्डाणपूल विषयावर जाहीर सभा घेण्याच्या ठरावाला हात उंचावून पाठिंबा दर्शविताना पंचायत मंडळ. २) हात उंचावून पाठिंबा दर्शविताना ग्रामस्थ. (प्रकाश धुमाळ )

आसपासच्या पंचायतींसह दोन्ही आमदारांना निमंत्रण

उड्डाणपूल धारगळ गावापूरताच मर्यादित नसून इतर लोकांसाठी तो गरजेचा आहे. त्यामुळे पंचायत मंडळाने पुढाकार घेऊन जवळपासच्या पंचायतींना पत्र पाठवून सभेसाठी निमंत्रित करावे.

तसेच या सभेला आमदार प्रवीण आर्लेकर व मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनाही आमंत्रित करावे, असे ग्रामस्थांनी सांगितले. सर्व पंचायत क्षेत्रातील लोकांनी तसेच वाहनचालक व प्रवाशांनी या जाहीर सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Dhargal Bridge
Goa Drugs Case: राज्यात ड्रग्ज तस्करीत वाढ; विदेशी नागरिकांसह स्थानिक युवकांचा सहभाग

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com