Department of Transport : वाहतूक खात्याकडून होतेय सतावणूक; हणजूण टुरिस्ट टॅक्सीचालकांचा आरोप

Department of Transport : हे खपवून घेणार नसल्याचा इशारा
Allegation of tourist taxi drivers
Allegation of tourist taxi driversDainik Gomantak

Department of Transport : कळंगुट, वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांकडून स्थानिक हणजूण तसेच वागातोर येथील टुरिस्ट टॅक्सीचालकांची गेले पंधरा दिवस नाहक सतावणूक करण्यात येत आहे.

स्थानिक चालकांना अडवून या ना त्या कारणाने वाहतूक अधिकारी विनाकारण दहा हजारांपर्यंतचा दंड ठोठावतात. मात्र, गोवा माईल्सच्या गाड्या आणि परप्रांतीय चालकांना विशेष मुभा दिली जाते.

यापुढे असे प्रकार हणजूण-वागातोर येथील टॅक्सीचालकांकडून खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा स्थानिक टॅक्सी संघटनेचे नेते योगेश गोवेकर यांनी दिला आहे.चिवार-हणजूण येथील मैदानात आयोजित पत्रकार परिषदेत गोवेकर बोलत होते.

वाहतूक खात्याकडून चालविण्यात येत असलेल्या फ्लायिंग स्कॉडच्या नावाखाली स्थानिक टुरिस्ट टॅक्सी चालकांना देण्यात येत असलेली दुजाभावाची वागणूक समजण्यापलीकडे आहे. बहुजनांच्या भल्यासाठी कार्यरत असल्याचा दावा करणाऱ्या डॉ. प्रमोद सावंत सरकारने येथील समस्येकडे विशेष लक्ष देत वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांना योग्य ती समज देऊन स्थानिक टेक्सिचालकांना न्याय मिळवून द्यावा.

- सुरेंद्र गोवेकर, पंचसदस्य, हणजूण-कायसूव पंचायत

समान न्याय द्यावा!

आसगाव पंचायतीचे माजी सरपंच जालिंदर गावकर यांनी वाहतूक खात्याच्या फ्लायिंग स्कॉडकडून स्थानिक टॅक्सीचालकांची फसवणूक त्वरित थांबवावी. अन्यथा गोवा माईल्सच्या गाड्या व परप्रांतीय चालकांना आम्ही अडवून ठेवू. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना दंड ठोठावून सर्वांसाठी समान न्याय असल्याचे दाखवून द्यावे, असे आवाहन केले. .

कायदा हातात घेऊ!

स्थानिक टुरिस्ट टॅक्सीचालक संघटनेचे नेते योगेश गोवेकर यांनी यापुढे असे प्रकार सहन केले जाणार नसल्याचे सांगितले. तसेच वेळप्रसंगी आम्ही कायदा हातात घेण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचा इशारा संबंधित खात्याच्या फ्लायिंग स्कॉडला दिला.

Allegation of tourist taxi drivers
Goa Crime News: विठ्ठलापूर - कारापूर येथे तरुणाची आत्महत्या | Gomantak Tv

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com