वास्‍को जळीतकांड प्रकरणी अजून आरोपपत्र नाही; विशेष पथकाकडून चौकशीची मागणी

Vasco Fire Incident: शिवानीचे वडील दिलीप सिंग चौहान यांनी हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे द्यावे, अशी मागणी केली हाेती
Vasco Fire Incident: शिवानीचे वडील दिलीप सिंग चौहान यांनी हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे द्यावे, अशी मागणी केली हाेती
CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: दहा महिने होत आले तरी वास्‍को येथील दुहेरी जळीतकांड प्रकरणात पोलिसांनी अद्याप आरोपपत्र दाखल केलेले नाही. या पार्श्वभूमीवर मयत शिवानी राजवत हिचा भाऊ शुभमसिंग चौहान यांनी गोव्‍याचे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना एक पत्र लिहून या प्रकरणाची एक विशेष पथक नेमून नि:पक्षपातीपणे चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. यापूर्वी शिवानीचे वडील दिलीप सिंग चौहान यांनी हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे द्यावे, अशी मागणी केली हाेती.

१८ नोव्‍हेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजता न्‍यू वाडे-वास्‍को येथे असलेल्‍या एका इमारतीत सिलिंडरचा स्‍फाेट होऊन शिवानी आणि तिची आई जयदेवी चौहान यांचा भाजून मृत्‍यू झाला होता. ज्‍यावेळी शिवानी मरण पावली त्‍यावेळी ती सहा महिन्‍यांची गरोदर हाेती.

सुरवातीला वास्‍को पोलिसांनी हे प्रकरण अनैसर्गिक मृत्‍यूचे असल्‍याचा गुन्‍हा नोंद केला होता. मात्र, वृत्तपत्रांनी हे प्रकरण लावून धरल्‍यानंतर सुमारे २० दिवसांच्‍या कालावधीनंतर शिवानीचा पती अनुरागसिंग राजवत याच्‍यावर खुनाचा गुन्‍हा नोंद केला हाेता तर त्‍याची आई साधना राजवत हिच्‍यावर आपल्‍या सुनेचा हुंड्यासाठी छळ केल्‍याचा गुन्‍हा नोंद केला होता.

Vasco Fire Incident: शिवानीचे वडील दिलीप सिंग चौहान यांनी हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे द्यावे, अशी मागणी केली हाेती
Vasco Theft: वास्कोत चोरट्यांचा धुमाकूळ; तीन दुकाने फोडली

लग्‍नात हुंडा कमी दिला म्‍हणून सासूकडून शिवानीचा मानसिक छळ होत होता, असे यापूर्वी तक्रारीत म्‍हटले होते.

याप्रकरणी विशेष पथक नेमून तपास करावा, अशी मागणी केली हाेती. मात्र, त्‍या मागणीवर अजूनही विचार झालेला नाही, याकडे शुभमसिंग यांंनी या पत्रात उल्‍लेख केला आहे. हे विशेष पथक त्‍वरित नेमून चाैकशी त्‍यांच्‍या हाती द्यावी आणि मृतांना न्‍याय द्यावा, अशी मागणीही केली आहे.

Vasco Fire Incident: शिवानीचे वडील दिलीप सिंग चौहान यांनी हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे द्यावे, अशी मागणी केली हाेती
Goa Crime: ‘एस्‍कॉर्ट’वर गोव्‍याबाहेरूनच नियंत्रण; संशयितांना पोलिस कोठडी

प्रकरणात मुद्दामहून दिरंगाई

अनुराग राजवत हा नाैदलामध्‍ये अधिकारी म्‍हणून काम करत असून आपल्‍या पदाचा फायदा उठवीत त्‍याने पोलिसांवर दबाव आणून हे प्रकरण दाबून ठेवण्‍याचा प्रयत्‍न केला, असा आराेप शुभमसिंग यांनी केला आहे. वास्‍तविक अशा प्रकरणात झटपट तपास होणे आवश्‍‍यक असताना वास्‍को पाेलिसांनी या प्रकरणात मुद्दामहून दिरंगाई केली आणि कित्‍येक पुरावे नष्‍ट करण्‍यासाठी संशयिताला वाव दिला, असा आरोप केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com