December Travel Booking For Goa Full: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशभरातील पर्यटक गोवा, मुंबई, जम्मू, केरळ, कन्याकुमारी, शिर्डी, तिरुपती, वैष्णोदेवी, मनाली, शिमला यासह विविध धार्मिक आणि पर्यटनस्थळी जाणे पसंद करतात.
डिसेंबरमध्ये ट्रेन, विमान आणि बसचे मोठ्या प्रमाणावर आगाऊ बुकींग केले जाते. यावेळी देखील अधिक बुकींग झाल्याचे दिसून येते असून अनेक गाड्यांना वेटिंग सुरू झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
डिसेंबरमध्ये गोव्यात कार्निव्हाल, नाताळ आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी देश - विदेशातील पर्यटक गोव्यात येत असतात. याकाळात पर्यटकांची रेलचेल गोव्यात पाहायला मिळते. लोकांनी आगाऊ बुकींगला सुरुवात केली असून, महिन्याच्या सुरुवातीलाच डिसेंबर महिन्यातच या मार्गांवर धावणाऱ्या अनेक गाड्यांमध्ये वेटिंग सुरू झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
डिसेंबर महिन्यात ग्वाल्हेरहून सुटणाऱ्या बहुतांश गाड्यांमध्ये जागा नाही. डिसेंबरमध्ये ग्वाल्हेरहून निघणारी झेलम एक्सप्रेस, मालवा एक्सप्रेस, अंदमान एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस आणि नवयुग एक्सप्रेसमध्ये वेटिंग सुरु आहे.
या गाड्यांमध्ये, स्लीपर कोचमध्ये 50 ते 80 लोक आणि एसी कोचमध्ये 20 पेक्षा जास्त लोकांचे वेटिंग आहे.
अनेक बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची तिकिटे अजूनही कन्फर्म होत नाहीत. त्यामुळे लोकांकडे आता फक्त तत्काळ तिकिटांचा पर्यार उरला आहे.
तत्काळ व्यवस्था करण्यासाठी अनेक प्रवाशांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. कारण तत्काळ तिकीट काढण्यासाठी सकाळपासून लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.