International Women's Day 2022: प्रतिभेला मोकळी भरारी मारण्याची संधी द्या

श्रद्धा गरड यांच्या विजिगुशी वृत्तीला सलाम
International Women's Day
International Women's DayDainik Gomantak

सुशांत कुंकळयेकर

मडगाव: ''माझं शरीर लुळे पडले, पण मी माझ्या प्रतिभेला कधीच लुळे पडू दिले नाही. तुम्हीही तुमच्या प्रतिभेला आवळून ठेवू नका. तिला मोकळी भरारी मारण्याची संधी द्या'. दोन वर्षांपूर्वी पेडणे येथे झालेल्या कोकणी युवा संमेलनात युवा कोंकणी कवयित्री श्रद्धा गरड यांनी विद्यार्थ्यांना हे आवाहन केले, तेव्हा संपूर्ण सभामंडप प्रभावित होऊन त्यांना उभे राहून मानवंदना देत होता. त्यांच्यातील विजिगुशी वृत्तीला हा सलाम होता. मडगाव येथील 36 वर्षीय युवा साहित्यिक श्रद्धा गरड यांचा जर प्रवास पाहिला तर अशक्य हा शब्दच जगाच्या शब्दकोशात नाही याची प्रचिती येणार.

International Women's Day
Women's Day: पणजी येथील जेसीआय क्वीन स्पर्धेत मैथिली सलेलकर प्रथम

कारण यंदाच्या युवा साहित्यिक अकादमी पुरस्कार विजेत्या साहित्यिका असलेल्या श्रद्धा यांचे खांद्याखालील पूर्ण अंग लुळे पडले असून त्यांच्या हाताचे केवळ एक बोट चालते. अशा अवस्थेतही जिद्द न सोडलेल्या श्रद्धाने आपल्या मोबाईलवर केवळ एका बोटाने कविता टाईप केल्या. त्यांतून ‘काव्य परमळ’ हा कविता संग्रह प्रकाशित झाला. याच संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कारही प्राप्त झाला. वास्तविक सुरवातीला श्रद्धा जी जणू वीजच वाटावी अशी चपळ मुलगी. कविता करणारी, टीव्हीवर बातम्या देणारी, महिलांसाठी कार्यक्रम आयोजित करणारी, जणू चैतन्यमूर्तीच.

एका प्रतिभावान युवा कवयित्री म्हणून दमदार वाटचाल सुरू असतानाच त्यांना एक असाध्य व्याधीने ग्रासले. त्यांच्या शरीराचा एक एक भाग लुळा होऊ लागला. त्या अक्षरशः अंथरुणाला खिळल्या. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीही या व्याधीसमोर हार मानली. पण श्रद्धा यांनी धीर सोडला नाही. त्यांनी आपले वाचन कायम ठेवले आणि कविता लिहिणेही.

कारण त्या मानत आल्यात, की माणसाला जगात आणणाऱ्या देवाने त्याच्यात भरभरून प्रतिभा भरली आहे. एका बाजूने काही कमी असल्यास दुसऱ्या बाजूने त्याला वरचढ केले आहे.

International Women's Day
थिवीच्या मुक्तिधामातील लाकडे आगीत खाक

त्यामुळेच श्रद्धा जरी लुळ्या झाली तरी त्यांनी आपल्या प्रतिभेला कधीच लुळे पडू दिले नाही. संघर्ष हेच आपले ध्येय मानणाऱ्या श्रद्धासारख्याच आणखी एक प्रतिभावान महिला साहित्यिक नमन धावसकर यांनी पुढाकार घेऊन या मोबाईलवर टाईप केलेल्या कवितांचा संग्रह प्रकाशित केला. 2020 मध्ये पेडणे येथे झालेल्या युवा कोकणी साहित्य संमेलनात त्यांच्या या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी त्यांनी मडगावहून रुग्णवाहिकेतून प्रवास करत पेडणे गाठले. युवा साहित्यिकांनाही प्रेरणा मिळावी, हेच त्यामागचे कारण.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com