Goa Valpoi Sattari Cyber Crime
पणजी: वाळपई - सत्तरी येथील एका व्यावसायिकाला ऑनलाइन पद्धतीने ए-३३ उच्च गुणवत्ता स्टॉक एक्स्चेंज ग्रुपमध्ये पैसे गुंतवून भरमसाट व्याजाने पैसे परत करण्याचे आमिष दाखवून सुमारे एक कोटीचा गंडा घातल्या प्रकरणी सायबर गुन्हे पोलिसांनी बंगळूरू येथील मेसर्स ऑरिंको डायनस्टेनचा मालक संशयित कुमार उत्लासर याला अटक केली आहे.
सायबर कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सत्तरीतील एका व्यावसायिकाला अधिक व्हॅट्सअप क्रमांक असलेल्या एका अज्ञाताने आमिष दाखवून पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले. गुंतवणूक केलेली रक्कम अधिक पटीने परत केली जाईल असे सांगून त्याला ए-३३ उच्च गुणवत्ता स्टॉक एक्स्चेंज ग्रुपमध्ये त्याच्या मोबाईलची नोंद करून सदस्य केले. त्यानुसार तक्रारदार व्यावसायिकाने सुमारे १ कोटी ३ लाख २८ हजार रुपये विविध डिजिटल माध्यमाद्वारे व्यवहार केला.
या प्रकरणाच्या दरम्यान संशयित कुमार उत्लासर याने विविध बँकांची खाती सायबर घोटाळा कारवायांसाठी लिंक केली होती व त्यावरून तो लोकांना आमिष दाखवून रक्कम गुंतवण्यास प्रवृत्त करून गंडा घालत होता. अशी बनावट ट्रान्सक्शनद्वारे त्याने सुमारे २ कोटी ३० लाखांना लुबाडले असल्याचे चौकशीत आढळून आले आहे. संशयित सध्या पोलिस कोठडीत असून त्याने आणखी कितीजणांना चुना लावला आहे याचा शोध पोलिस घेत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.