Goa News : कुडतरी अयप्पा मंदिरासमोरील रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण

Goa News : यासंदर्भात स्थानिकांनी सांगितले, की या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे ही मागणी आम्ही दोन वर्षांपासून करीत होतो. मात्र, आमचे कोणीच कानावर घेतले नाही.
Goa
Goa Dainik Gomantak

Goa News :

सासष्टी, कुडतरी मतदारसंघातील अयप्पा मंदिरासमोरील रस्ता गेली दोन वर्षे डांबरीकरणाची वाट पाहात होता, पण दोनच दिवसांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण व हॉटमिक्सिंग केल्याने स्थानिकांना दिलासा मिळाला आहे.

यासंदर्भात स्थानिकांनी सांगितले, की या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे ही मागणी आम्ही दोन वर्षांपासून करीत होतो. मात्र, आमचे कोणीच कानावर घेतले नाही.

Goa
Goa Garbage Issue: कचरा व्यवस्थापन संचालकपदी अंकित यादव

भाजपच्या कुडतरी मंडळाच्या सरचिटणीस डॉ. स्नेहा भागवत तसेच भाजपच्या एसटी मोर्चाचे उपाध्यक्ष अँथनी बार्बोझा यांनी ही बाब मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कानावर घातली व त्यांच्या प्रयत्नांमुळे या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. त्यासाठी आम्ही सरकारचे आभार मानत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com