Cuncolim : ‘कोविड’ काळात हानी; पण कष्टातून यशाला गवसणी!

कुंकळ्ळीच्या शेतकरी दाम्पत्याची यशोगाथा : फणसापासूनच्या पदार्थांतून व्यवसायात यश .
Farmer
FarmerDainik Gomantak

श्यामकांत नाईक

Cuncolim : कोविड काळात अनेक लोकांचे व्यवसाय तसेच कामावरही परिणाम झाला होता पण यातून काही लोकांनी मार्ग काढून परत एकदा आपल्या व्यवसायाला नवीन उभारी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. कुंकळ्ळी येथील गोविंद केणी या शेतकऱ्याला कोविड काळात नुकसानीला सामोरे जावे लागले होते. पण त्यांनी खचून न जाता फणसापासून तयार होणारे पदार्थ बनवण्याचा व्यवसाय पत्नीच्या साथीने सुरू केला असून त्यात ते यशस्वी ठरले आहेत.

कुंकळ्ळी येथील गोविंद केणी हे गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून शेती व्यवसायात असून त्यांच्या कुळागरात सुपारी,माड,मिरी अशी उत्पादने आपल्या बागायतीत घेत होते. ते म्हणाले,की कोविड काळात सुपारी व मिरी झाडांना एक रोग आल्याने आपण हताश झालो होतो. पण खचून न जाता फणसापासून खाणारे पदार्थ बनविण्यास सुरवात केली. तीन वर्षांपूर्वी हा व्यवसाय सुरू केला व यात आपल्या पत्नीची चांगली साथ लाभल्याचे त्यांनी सांगितले.

Farmer
Goa Accident News : करमल घाटात कार दरीत कोसळून युवक जागीच ठार; पर्वरीत कार दुभाजकाला धडकली

आमच्या बागायतीत मिरीची लागवड चांगली होत असून आपण खास शिरशी येथे जाऊन ग्राफ्टींग चे प्रशिक्षण घेतले आहे, याचा बराच फायदा झाल्याचे केणी यांनी सांगितले. ग्राफ्टींग केलेले मिरी चे झाड चांगला फायदा देत असल्याने या हा व्यवसाय सुरूच ठेवल्याचे त्यांनी सांगितले. फणसापासून तयार होणारे पदार्थाच्या व्यवसायात आपली पत्नी सांभाळत असल्याचे केणी यांनी सांगितले. पूर्वी आम्ही हातानेच हे पदार्थ तयार करीत होतो. पण आता मशीन आणली असून त्याचा चांगला उपयोग होत असून कामही जास्त होते,असे त्यांनी सांगितले.

Farmer
Goa Crime News : गोव्यातील माजी मंत्र्याविरुध्द मुंबईत 14 कोटींच्या फसवणूकीची तक्रार

चांगल्या फणसांसाठी होते भटकंती !

चांगले फणस सहजासजी मिळत नसल्याने खूप फिरावे लागते व फणस तपासूनच घ्यावा लागतो. अन्यथा पदार्थ चांगले होत नाहीत लोकांना रूचकर पदार्थ देण्याचा प्रयत्न असून यात आम्हाला यश लाभले. यावर्षी 300 किलो पदार्थ बनवण्याचा मानस असल्याचे गोविंद केणी यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com