Goa Crime News : गोव्यातील माजी मंत्र्याविरुध्द मुंबईत 14 कोटींच्या फसवणूकीची तक्रार

रेईश मागूश रियल इस्टेटच्या संचालकांविरुद्ध गुन्हा
Fraud Case
Fraud CaseDainik Gomantak
Published on
Updated on

एका गुंतवणुकदाराची तब्बल 14.9 कोटींची कथित आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने गोव्यातील रेईश मागूश रियल इस्टेट कंपनी व त्यांच्या तिघा संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यात कळंगुटचे माजी आमदार तथा मंत्री सुरेश परुळेकर यांचा प्रमुख सहभाग आहे.

हा फसवणुकीचा प्रकार जानेवारी २००८ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत घडला. हा प्रकार मुंबईतील तारदेव येथील बेसाईड मॉलमधील कार्यालयात घडला आहे. या प्रकरणी तक्रारदाराने मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली, त्यानुसार गुन्हे शाखेने वरील इस्टेट कंपनीच्या तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Fraud Case
Car Stunt On Porvorim Road: कर्नाटकच्या ‘हिरो’ची गोव्यात स्टंटबाजी; व्हिडिओ व्हायरल

प्रेमानंद गावस यांनी रेईश मागूश इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड व त्याचे तीन संचालक सुरेश परुळेकर, प्रसाद परुळेकर आणि मंदा सुरेश परुळेकर यांच्यावर मालमत्ता उपलब्ध करून देण्याच्या बहाण्याने आपली फसवणूक केल्याचा आरोप करीत तक्रार दाखल केली आहे.

सुरेश परुळेकर अडचणीत

माजी आमदार तथा मंत्री सुरेश परुळेकर हे मुख्य संशयित असून, मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. संशयितांना मुंबईत चौकशीला बोलावण्याची शक्यता आहे किंवा या फसवणूक प्रकरणाशी संबंधित पुरावे तपासण्यासाठी गुन्हे शाखेचे एक पथक गोव्यात दाखल होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com