Goa Monsoon: उशिरा मॉन्सूनचा ‘काकडी’ला फटका

उत्पादन लांबणीवर: प्रियोळची काकडी जुलैअखेरीस बाजारात होणार दाखल
Goa Monsoon
Goa MonsoonDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Monsoon राज्यात मॉन्सून उशिरा दाखल झाल्यामुळे काकडीचे उत्पादन लांबणीवर पडले होते. गेल्या ८ दिवसांपूर्वी प्रियोळ येथील माळरानावर शेतकऱ्यांनी काकडी लावण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे जुलैच्या अखेरीस ही काकडी फोंडा किंवा मडगाव बाजारात दाखल होऊ शकते.

येथील महिला शेतकरी नकाशा गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार एरव्ही येथील काकडी फोंडा व मडगाव बाजारपेठांत मोठ्या प्रमाणात जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होते. पण यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्याने पिकावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

Goa Monsoon
Valpoi News : त्‍यांनी’ आपला तरुणपणीचा सायकल प्रवास बनवला यादगार!

पावसाचे आगमन लांबल्याने काकडी पिकावर परिणाम होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसाळा उशिरा सुरू झाल्याने काकडीचे मळे उशिरा फुलणार आहेत.

येथील काकडी जादा दर मिळत असल्याने मडगाव बाजारात विकण्यासाठी नेण्यात येते. परिसरातील शेतकरी एकत्रितपणे वाहनातून मडगाव बाजारात काकडी नेतात. पण यंदा उशीर झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक हानी सोसावी लागणार असल्याचे महिला शेतकरी नकाशा गावडे यांनी सांगितले.

Goa Monsoon
'Kalas Kund' waterfall: 'या' कारणास्तव पर्यटकांसाठी 'कळसकोंड’ धबधबा बंद, स्थानिकांचाही निर्णयाला पाठिंबा

प्रियोळ,शिरोडाच्या काकडीला मागणी

फर्मागुडी परिसरातील डोंगराळ भागात काकडीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. शिरोडा, प्रियोळ, बेतोडा परिसरातील शेतकरी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात काकडीची व अन्य भाज्यांचे पीक घेतात.

फोंडा, मडगाव, पणजी व अन्य बाजारात काकडीला मोठी मागणी आहे. परंतु पावसाच्या उशिरा आगमनामुळे यावर्षी खवय्यांना उशिरा काकडी उपलब्ध होणार आहे.

यासंबधी फर्मागुडी येथील डोंगराळ भागात काकडीचे मळे करणारे धोंडशी येथील निळू गावडे यांनी पूर्वजांपासून काकडीचे मळे पावसाळ्यात परिसरातील शेतकरी फुलवत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com