Brezelfest Goa: दोन संस्कृतीना जोडणारा पूल 'ब्रेझलफेस्ट'; तीन मैत्रिणींच्या संकल्पनेतून 'गोव्यात' होणार साकार

Seraulim South Goa: जर्मन बेकरी पॉसेनेनब्रोट स्वादिष्ट जर्मन खाद्यपदार्थ आणि पारंपरिक ब्रेझेल या महोत्सवात पुरवणार आहे. जर्मनी असो किंवा गोवा, बियरशिवाय कोणताही उत्सव साजरा होत नाही हे लक्षात घेऊन या महोत्सवासाठी खास बनवलेली अस्सल जर्मन पिल्सनर बियर लोकांना अनुभवता येईल. 
Brezelfest Goa, Andrea Thumshirn, Ragini Dhingra, Yogita Mehra
Andrea Thumshirn, Ragini Dhingra, Yogita MehraDainik Gomantak
Published on
Updated on

Brezelfest Goa 2024

किंबर्ली कुलासो 

तीन मैत्रिणींच्या संकल्पनेतून साकार होणारा ‘ब्रेझलफेस्ट’ महोत्सव (Brezelfest) गोवा आणि जर्मन या दोन संस्कृतीना जोडणारा पूल असेल. कोणत्याही चमकदार कामगिरीचे यश साजरे करण्यासाठी असो किंवा आव्हानात्मक क्षाणांमध्येमध्ये दिलासा मिळवण्यासाठी असो, थंडगार बियर नेहमी एक आश्वासक वातावरण तयार करते- ज्यातून प्रतिबंधांची तीव्रता आपोआप कमी होते. असेच काहीसे या तिघा मैत्रिणीबद्दल घडले.

बेकर, माळी आणि कलाकार अशा तीन वेगवेगळ्या व्यवसायात असलेल्या या मैत्रिणी जेव्हा एकत्र आल्या तेव्हा बिअरचा आस्वाद घेता घेता त्यांना अन्न, कला आणि संगीताद्वारे लोकांना एकत्र आणण्याची कल्पना सुचली.

दक्षिण गोव्यातील तीन महिला उद्योजिका एन्ड्री थुमशर्न ( बाणावलीतील पॉसेनब्रॉट या बेकरीची बेकर), रागिनी धिंग्रा (पॅडी फिल्ड्स स्टुडिओ चालवणारी कलाकार) आणि योगिता मेहरा (ग्रीन असेन्शियल्स हे आस्थापन चालवणारी माळी) यांनी अशा प्रकारे प्रथमच अस्सल जर्मन ब्रेझल फेस्ट गोव्यात सुरू करण्याचा संकल्प केला. 

७ नोव्हेंबर २०२४ रोजी दक्षिण गोव्यातील सेरावली येथे आयोजित होणारा हा जर्मन ब्रेझल फेस्ट महोत्सव गोवा आणि जर्मन संस्कृतीतील अनेक घटकांना एका व्यासपीठावर घेऊन जाईल, जिथे अस्सल जर्मन बियर खाद्यपदार्थ आणि संगीत यांचा आस्वाद लोकांना मनमुरादपणे घेता येईल.

त्याचबरोबर म्युनिकमधील मूळ ऑक्टोबर फेस्टचे बँड, डाय किर्चडार्फरच्या‌ संगीतावर नृत्य करण्याची संधी  ब्रेझल फेस्टमध्ये मिळणार आहे. हे बँड गेल्या वीस वर्षापासून महाराष्ट्रातील पुणे शहरात होणाऱ्या ऑक्टोबर फेस्टमध्ये सादरीकरण करत आले आहे.‌ 

संगीताचा आनंद लुटताना गोव्यातील प्रेक्षकांना ताजे ब्रेझेल, बॅटवुर्स्ट, स्निट्झेल, सोर्डोघ सँडविच, एपल क्रंबल, सिनेमन रोल्स यासारखे युरोपियन देशातील स्वादिष्ट पदार्थ चाखण्याची संधी मिळेल. जर्मन बेकरी पॉसेनेनब्रोट स्वादिष्ट जर्मन खाद्यपदार्थ आणि पारंपारिक ब्रेझेल या महोत्सवात पुरवणार आहे.

जर्मनी असो किंवा गोवा, बियरशिवाय कोणताही उत्सव साजरा होत नाही हे लक्षात घेऊन या महोत्सवासाठी खास बनवलेली अस्सल जर्मन पिल्सनर बियर लोकांना अनुभवता येईल. 

या महोत्सवामागची पार्श्वभूमी सांगताना एन्ड्रीया थुमशर्न म्हणाल्या, 'लोकांना दक्षिण गोव्यात वळवेल असा एक बेंचमार्क इव्हेंट आम्हाला आयोजित करायचा होता. गेली चार वर्षे मी गोव्यात जर्मन बेकरी चालवते.

Brezelfest Goa, Andrea Thumshirn, Ragini Dhingra, Yogita Mehra
Dhendlo Utsav: ‘दे धेंडलो, धेंडल्यान पावस शेणलो’! लोकगीतांच्या गजरात गोव्यात 'धेंडलो उत्सव' साजरा

त्यापूर्वी माझ्या भारतीय नवऱ्याबरोबर भारतातील विविध ठिकाणी मी वास्तव्य केले आहे. पुण्यात इंडो जर्मन चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित करत असलेल्या ऑक्टोबर फेस्टमध्ये सहभागी होणे आम्हाला नेहमी आवडायचे, जेथे पारंपारिक जर्मन ऑक्टोबर फेस्ट बॅन्डच्या संगीताचा आनंद मला घेता यायचा. माझ्या देशापासून दूर असताना मला माझ्या मुळांशी जोडणारा हा एक महोत्सव होता.'

सेरावली येथे होणाऱ्या या ‘ब्रेझल फेस्ट’ महोत्सवात हस्तकला, सेंद्रिय किचन गार्डनिंग, लाइफ कोचिंग, शून्य कचरा, क्रोशे कला आदी विषयावर  कार्यशाळा आयोजित होणार आहेत. स्थानिक उद्योजकांना या महोत्सवात विशेष स्थान असेल.

स्नेलमेल नावाच्या हस्तनिर्मित पोस्टकार्डचे लॉन्चिंग हे या महोत्सवामधील मुख्य आकर्षण असेल. विख्यात समाजकार्यकर्त्या आवडा व्हिएगस यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशनही या महोत्सवात होणार आहे आणि अर्थातच गोमंतकीय संगीत या महोत्सवाचा भाग असणारच आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com