Mandovi And Zuari: कोरोनाचा असाही फायदा! मांडवी-झुआरीतील मायक्रोप्लास्टिक्सच्या प्रमाणात घट

मायक्रोप्लास्टिक्स हे प्लास्टिकच्या कचऱ्याचे अत्यंत लहान तुकडे असतात.
Goa River Research
Goa River ResearchDainik Gomantak

Mandovi And Zuari: कोविड-19 महामारीच्या काळात गोव्यातील मांडवी आणि झुआरी नदीच्या पाणी आणि पृष्ठभागातील मायक्रोप्लास्टिकच्या प्रमाणात लक्षणीय घट झालीय, असे एका संशोधनातून समोर आले आहे.

मायक्रोप्लास्टिक्स हे प्लास्टिकच्या कचऱ्याचे अत्यंत लहान तुकडे असतात. विविध उत्पादने आणि औद्योगिक कचरा यांचे विघटन होऊन तयार होतात. हे तुकडे महासागर आणि जलचरांसाठी हानिकारक असतात.

सीएसआयआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी संशोधकांच्या टीमने कोविड-19 महामारी काळात गोव्यातील नदीच्या प्रदेशात मायक्रोप्लास्टिक बाबत अभ्यास केला होता. या प्रकरणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शोधनिबंधात 2020 मध्ये कोविड-19 चा उद्रेक झाल्यानंतर मायक्रोप्लास्टिक्समध्ये तीव्र घट झाल्याचे दिसून येते, असे म्हटले आहे.

कोरोनानंतर नदीतील मायक्रोप्लास्टिक्सच्या प्रमाणात दोन ते सात पटीने घट झाल्याचे या संशोधनातून समोर आले आहे. कमी झालेले प्रमाण सागरी जीवांसाठी उत्तम असल्याचे या संशोधनाच्या शोधनिबंधात म्हटले आहे.

संशोधनात मांडवी आणि झुआरी नदीच्या पाण्यातील कोरोना पूर्वीचे मायक्रोप्लास्टिक्सचे प्रमाण आणि कोरोनानंतरचे प्रमाण असा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

कोरोना काळात नागरिकांच्या सवयींमध्ये झालेल्या बदल आणि नैसर्गिक घटकांमध्ये कमी प्रमाणातील हस्तक्षेप यामुळे ही घट पाहायला मिळत आहे, असे या शोधनिंबधात म्हटलंय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com