Porvorim Flyover
पणजी: पर्वरी ते सुकर जंक्शन दरम्यान उभारल्या जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पासाठी गोवा सरकार ३८६ कोटी रुपये खर्च करणार आहे. एकूण ८६ खांबांवर हा उड्डाणपूल उभारण्यात येणार असून यापैकी १२ खांब आतापर्यंत उभारले गेले आहेत. १७ खांबसाठी पायाभूत सुविधा पूर्ण झाल्या आहेत. या उड्डाणपुलासाठी १,४३१ काँक्रिटचे खंड (ब्लॉक) वापरण्यात येणार आहेत.
गोव्याच्या परिवहनच्या पायाभूत सुविधांमध्ये या उड्डाणपुलामुळे एक नवी भर पडणार आहे. पर्वरी येथे उभारल्या जाणाऱ्या फ्लाईओव्हरचे काम वेगाने सुरू असून या प्रकल्पासाठी राज्य सरकार ३८६ कोटी रुपये खर्च करणार आहे.
हा उड्डाणपूल गोव्यातील वाहतूक कोंडीच्या समस्या सोडवण्यासाठी एक महत्त्वाचा पाऊल ठरणार आहे.
उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने, म्हापसा ते पणजी मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी देखील वाढली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लवकरच उपाययोजना होण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. वळविण्यात आलेला मार्ग हॉटमिक्स करण्यात आला नसल्याने वाहनचालक रोज खड्ड्यांवरून वाहन चालवितात. पावसात या मार्गावर पाणी साचल्याने चिखल देखील होतो. अशावेळी दुचाकी चालविणे कठीण होत असल्याच्या प्रतिक्रिया वाहनचालक देत आहेत.
या उड्डाणपुलामुळे सुकर जंक्शन ते पर्वरीतील गौरी पेट्रोलपंप दरम्यानची वाहतूक कोंडी कमी होईल. यामुळे स्थानिक नागरिकांना प्रवास करण्यासाठी कमी वेळ लागेल. तसेच यामुळे अपघातांची संख्याही कमी होण्याची अपेक्षा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.