Goa Traffic Issues: सांतिनेज-कांपाल रस्त्यावर कोंडी

Goa Traffic Issues: वाहनचालकांत संताप: वाहतूक पोलिस असतात कुठे, हाच मोठा प्रश्‍न
Traffic Issue
Traffic IssueDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Traffic Issues: सांतिनेजमध्ये ‘स्मार्ट सिटी’ मिशनअंतर्गत कामे सुरू आहेत. त्यामुळे या कामासाठी वापरण्यात येणारे जेसीबी, ट्रक हे वाहतूक कोंडीला कारण ठरत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे सकाळी सरकारी कार्यालये सुरू होण्यापूर्वी आणि कार्यालये सुटल्यानंतर सायंकाळी असे दोनवेळा तरी वाहतूक पोलिस दीड-दोन तास याठिकाणी ठेवणे आवश्‍यक आहे.

मध्यंतरी ‘गोमन्तक’ने ही बाब निदर्शनास आणल्यानंतर काही दिवस पोलिस दिसले, पुन्हा ते जे गायब झाले ते गायबच आहेत.

सांतिनेजमध्ये वाहतूक कोंडी गेली काही महिन्यांपासून नित्याची झाली आहे. ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत रस्ता, मलनिस्सारण वाहिनीचे, चेंबरचे आणि गटाराचे असे काम सुरू आहे. सध्या पणजीतून मधुबन सर्कल किंवा ताळगावकडे जाण्यासाठी शीतल हॉटेलपासून सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यालय आणि तेथून वळण घेऊन केरळा हॉटेलकडे वाहन काढावे लागते.

Traffic Issue
Lok Sabha Election: ‘निवडणूक आयोग की मोदी आयोग’

काही आठवड्यांपूर्वी ‘गोमन्तक’ने या वाहतूक कोंडीविषयी आवाज उठविला होता, तेव्हा वाहतूक पोलिस दिसत होते. परंतु पोलिसांची नितांत गरज असताना वाहतूक पोलिसच दिसेनासे झाले आहेत.

...पण नियोजन करणार कोण ?

सांतिनेजमध्ये वाहतूक कोंडी कधी-केव्हा होते हे माहीत असतानाही कंत्राटदाराने वाहने रस्त्यातून हटविणे आवश्‍यक आहे.वाहतूक पोलिस विभाग तिथे पोलिस नेमण्याबाबत गांभीर्याने पाहताना दिसत नाही. योग्य नियोजन केल्यास कोंडी होणार नाही, पण हे नियोजन करायचे कोणी, असा प्रश्‍न आहे. ‘स्मार्ट सिटी’चे कामाशी सर्व खाती जोडलेली आहेत. मग जबाबादारीत का टाळाटाळ होते, हा प्रश्‍न आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com