Vegetables Rates : थंडीच्या दिवसांत भाज्यांचे दर कडाडले; ग्राहकांच्या खिशाला कात्री

Vegetables Rates : कांदा, बटाटे, टोमॅटोंचे दर स्थिर
Goa Vegetable Rate
Goa Vegetable RateDainik Gomantak
Published on
Updated on

Vegetables Rates : पणजी, बाजारात सद्या कांदा, बटाटे आणि टोमॅटोचे दर मागील आठवडाभरापासून स्थिर आहेत. परंतु भाज्या आणि फळांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

थंडीच्या दिवसांत भाजी, फळांचे दर कडाडल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला बराच फटका बसत आहे.

भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रती किलो कारली १०० रू., भेंडी ९० रू., वालपापडी १०० ते १२०, ढब्बू मिरची १०० ते १२० रू. लसूण तब्बल ४०० तर आले २०० रुपये किलो दराने विकले जात आहे.

फलोत्पादन महामंडळाच्या गाळ्यांवर दर काही प्रमाणात कमी आहेत. परंतु ऐनवेळी भाजी मिळणे कठीण होते.त्यामुळे बहुतांशी नागरिक बाजारातूनच भाजी खरेदीला पसंती देताना दिसतात.

Goa Vegetable Rate
Goa Industry : 'उद्योग व्यवसायात काम करण्यासाठी गोव्यातील तरुणांना प्राधान्य द्यावे' | Gomantak Tv

गावठी भाज्यांना मागणी

राज्यात ग्रामीण भागात पिकविलेल्या पालेभाज्या तसेच अळूमाडी, भाजीची केळी, वाली तसेच इतर भाज्यांना चांगली मागणी आहे.

बेळगावहून येणाऱ्या भाज्यांपेक्षा ग्रामीण भागातून येणाऱ्या भाज्या खरेदीकडे नागरिकांचा अधिक कल असतो, परंतु मागणी एवढा पुरवठा गावठी भाज्यांचा सध्या होत नसल्याने काहींना बेळगावहून येणाऱ्या भाज्याच खरेदी कराव्या लागतात.

फळांच्या दरातही वाढ

सध्या मार्गशीर्ष गुरुवार पूजनकाल असल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात फळे खरेदी केली जात आहे. फळांना मागणी वाढल्याने दरातही वाढ झाली आहे. सफरचंद, मोसंबी, संत्री, सीताफळ, केळी, चिकू, डाळिंब तसेच इतर सर्व फळांच्या दरात वाढ झाली आहे.

सफरचंद २५० ते ३०० रुपये किलो, केळी ८० रू. अननस ७० ते ८०, संत्री ९० ते १०० अशा दरात बाजारात विक्री सुरू आहे. पणजी बाजारात मार्गशीर्ष गुरुवारनिमित्त लागणारी उत्तम दर्जाची पाच फळे १३० रुपयांना विकली जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com