गोव्यातील 'राजकीय पर्यटना'चा टॅक्सी, हॉटेल्सना फायदा

स्थानिक पर्यटन-केंद्रित व्यवसायांमध्ये वाढ व्हावी यासाठी राष्ट्रीय पक्षांच्या अधिकाधिक नेत्यांनी गोव्याला भेट द्यावी अशी इच्छा मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केली.
Goa CM Pramod Sawant
Goa CM Pramod SawantDainik Gomantak

पणजी: आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांची, विशेषत: गोवा (Goa Election) राज्याला भेट देणाऱ्या राष्ट्रीय राजकीय पक्षांच्या नेत्यांची खिल्ली उडवत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी काल रविवारी उपहासात्मक वक्तव्य केले. कोरोना महामारीमुळे बंद पडलेले राज्यातील टॅक्सी (Taxi) आणि हॉटेल (Hotels) व्यवसाय पुन्हा चांगल्या पध्दतीने सुरू होइल म्हणून मी या नेत्यांच्या भेटीचे गोव्यात स्वागत करतो. कारण यांच्या भेटीमुळे गोव्यातील स्थानिक व्यावसायिकांना व्यवसाय मिळेल. स्थानिक पर्यटन-केंद्रित व्यवसायांमध्ये वाढ व्हावी यासाठी राष्ट्रीय पक्षांच्या अधिकाधिक नेत्यांनी गोव्याला भेट द्यावी अशी इच्छाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

तृणमूल काँग्रेस (TMC) च्या ममता बॅनर्जी आणि काँग्रेसचे राहुल गांधी या राष्ट्रीय राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गोव्याला भेट दिली. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आज गोव्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. रविवारी भाजप युवा मोर्चाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी या राष्ट्रीय नेत्यांच्या गोवा दौऱ्याचा उल्लेख 'राजकीय पर्यटन' असा केला. “हे राजकीय पर्यटन आहे. पुढील 4 महिन्यांत, कोविडमुळे त्रस्त झालेल्या टॅक्सी आणि हॉटेल व्यवसायांना अशा प्रकारच्या पर्यटनामुळे चांगला व्यवसाय मिळेल,” असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

Goa CM Pramod Sawant
शिक्षकांनी धुडकावले मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) नेते आणि खासदार राहुल गांधी शनिवारी मोटारसायकल पायलटसह पिलियन रायडर म्हणून पणजीला कसे गेले याचा संदर्भ देत सावंत म्हणाले की मोटरसायकल पायलट आणि रिक्षा यांच्या सेवा वापरणे ही त्यांची आणि इतर गोवावासीयांची इच्छा असावी. मात्र राहुल गांधींनी मोटारसायकल पायलटची सेवा वापरली हे बघून मला चांगले वाटले. त्यांनी हे पहिल्यांदाच केले असावे असे सांगून ते म्हणत हा प्रवास गोवावासीयांना किंवा राजकारण्यांना नवीन नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

"ममता बॅनर्जी आणि राहुल गांधी मच्छिमारांच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी भेटले बैठका घेतल्या ते मला काही नविन नाही. मी रोज बाजारात जातो तेव्हा ते मच्छिमारांना भेटतो. त्यांच्या तक्रारी ऐकतो. काँग्रेसकडे फक्त चार आमदार उरले आहेत आणि त्यापैकी दोन भाजपमध्ये आहेत आणि एक आमदार होता. तो जवळजवळ पक्ष सोडून गेलाय असच समजाव. तेव्हा आता काँग्रेसकडे फक्त दीड आमदार उरले आहेत," असे म्हणत त्यांनी काँग्रेसच्या सद्यस्थितीची खिल्ली उडवली आणि काँग्रेसवर आणखी टीका केली.

Goa CM Pramod Sawant
स्वयंपूर्ण युवा महोत्सवातून दोन हजार रोजगार: मुख्यमंत्री

“आम्ही 10 आमदारांना भाजपमध्ये आणण्यासाठी कधीच प्रयत्न केला नाही. त्या 10 (माजी काँग्रेस) आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले चांगले काम पाहून भाजपमध्ये प्रवेश केला. आम्ही फक्त त्यांचे आमच्या पक्षात स्वागत केले. गोव्याचा विकास पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केवळ भाजपच करू शकते" असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com